महिला आणि आरोग्य women’s and health yoga treatments

महिलांचे आरोग्य

महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते ती जागृत व्हावी आणि समाजात हे त्यांच्या विषयीआरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे. आहार,चांगल्या सवयी,योगा आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांच्या आरोग्य टिकणे आवश्यक आहे.समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय कारणानुसार वीस ते तीस वर्षं हे वय प्रसूतीसाठी योग्य असते. पूर्वी प्रत्येक स्त्रीला पाच ते सहा वेळा बाळंतपणाच्या दिव्यातून जावे लागत होते. घरगुती बाळंतपणात कधी मातेचा जीव जातअसे आता शस्त्रक्रिया मध्ये रक्तस्राव झाला तर रक्त पुरवण्याची सोय असल्याने माता मध्ये माता मृत्यु व बाल मृत्यू चे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग या आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे.आज महिला चुल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत.घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतातील महिला मात्र हवे तेवढे लक्षात येत नाही.शहरातील सुमारे तीस टक्के महिलांना स्तनाचा कॅसर धोका असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्त्रीयांमध्ये संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत आहेत. स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जननसंस्थेचचे आजार व कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत जरी सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रम राबविल्यास अनेक महिलांची जीव,प्राण वाचवू शकतात.आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीसच्या आत त्यांना त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न राहता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे.ॲनिमिया, रक्ताच्या गर्भाशयातील आजार, गर्भाशयाचा कॅन्सर, डायबिटीस विषयी प्रत्येक महिलेला योग्य माहिती पुरवली पाहिजे. भारतामध्ये कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये मृत्यूच्या प्रमाणे जास्त आहे. स्त्रियांनी निकोप शरीर व निकोप मन यांचा आग्रह धरला पाहिजे. हा प्रश्न भावनिक पातळीवर न पाहता स्त्री आरोग्याशी संबंधित हवा.

महिलांचा आहार

सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण,शिक्षण,सरकारी नोकरी या सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरांमध्ये स्वतःकडे किती हिरिरीने पाहतात, स्वतःच्या आरोग्य,आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्ध्या आयुष्य स्वयंपाक घरात जात असले तरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर उरेल तेच खायच आणि काही वाया जाऊ द्यायचे नाही म्हणून संपवायच,या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसाव्या शतकात तरी बाहेर येत नाहीये. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. त्याला भूक लागलेली असते आणि तिला काम ही करायचा असतं.त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लवकरात लवकर काहीतरी खाल्ले पाहिजे आणि चहा हा त्यावरचे उत्तर नाहीच यामुळे भूक याची भावना विसरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो सकाळी लवकर नाष्टा केला दिवसभरात अचानक भूक कमी लागते. पित्त होणे या गोष्टीचा त्रास होत नाही. नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड बिस्कीट वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखादा धान्याचा पदार्थ खाल्ल्यास उत्तम. दुपारच्या जेवणामध्ये भात, वरण, भाकरीसोबत हिरव्या पाल्याभाज्या डाळी उसळी, ताक ,दही अशा पदार्थांचा समावेश असू द्या.मुले नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वतःसाठी स्वयंपाक करण्याचा आणि खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ सोडल्यास आपले दैनंदिन पोषण मुल्यांची गरज पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. संध्याकाळी चिप्स चिवढा या गोष्टीपेक्षा सुकामेवा,फळे,लाह्या फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा. त्यामधे तळलेले पदार्थ,गोड पदार्थ, खाणे टाळावे. अंडी मासे करण्यासाठी संध्याकाळची वेळ वेळ योग्य ठरते. आपला आहार हे आपले इंधन आहे हे ध्यानात घेऊन प्रत्येक स्त्रीने आजाराविषयी काळजी घेतली पाहिजे.

See also  झटपट पोटाची चरबी कमी करायची तर मग हा आहार घ्या weight loss tips

योग आणि महिला

महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात.महिला कुटुंबाविषयी नितांत समर्पणाची जबाबदारी पार पाडतात. पण हे सर्व करताना पुरेश्या व्यायामाअभावी स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जातो आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. आरोग्याच्या तक्रारी वाढतात. अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा होना राग येणे सुरू होते. मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून जाते त्यामध्ये डिप्रेशन येते, मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी जो वैद्यकीय खर्च करावा लागतो तो निराळाच.पण मग हे सर्व टाळू शकत नाही का तर नक्कीच टाळू शकतात.यासाठी महिलांनी थोडा स्वार्थी होणे गरजेचं असतं त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा. पुरेसा व्यायाम करावा,चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीच तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा एक तास योग्य केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या सुटू शकतात वाढते वजन नियंत्रणात येते. संध्याच्या त्रास, गुडघेदुखी श्वसनाचे विकार बरे होतात. वाढते शुगर कोलेस्ट्रॉल,गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी वर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इन बॅलन्स ने सुरू होतात. योग सर ह्या सर्वांच्या मुळावर घाव घालत असल्याने या समस्यांना सराईतपणे बऱ्या होतात. आसान, प्राणायाम,सूर्यनमस्कार, व्यायाम केल्याने मात्र महिला चांगले घर काम करू शकतात.म्हणून म्हणूनच समस्या निर्माण होणे आधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे.

महिलांचे प्रबोधन काळाची गरज

महिलांचे आरोग्य या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे नाकारून चालणार नाही. देशातील प्रत्येक महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्यांचा परिणाम निश्चित पणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. आपल्या देशातील महिलांच्या आरोग्य चिंतेची व चिंतनाची बाब बनली आहे. या महिलांचा विकास लहानपणापासूनच व्हायला हवा. तिच्या शारीरिक, मानसिक, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलेला बालपणीच मिळणारा योग्य आणि पोषक आहार महिलेच्या पुढील आयुष्य आणि आरोग्य ठरवित असतो.आज कुपोषणाची समस्या भेडसावत आहे त्यातून महिलाही सुटलेले नाही. अगदी गर्भवती अवस्थेतील महिलेचे जर उदाहरण घेतले तर गर्भवती असताना त्यांना मिळणारे पोषण योग्य तेवढे दिसत नाही. ग्रामीण आणि वन क्षेत्रातील गर्भवती महिलेची स्थिती तर खूपच हालाकीची आहे. बरश्या डिलिव्हरी घरगुती होतात. तेथे त्या महिलांना कोणतेही डॉक्टर साहाय्य उपलब्ध होत नाही. स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले असल्याने गर्भलिंगतपासणी यावर प्रतिबंध आणावा लागला. गर्भाचे नीट पोषण झाले नाहीतर जन्माला येणारे बाळ काही कमी वजनाच्या आणि कुपोशीत जन्माला येणार.तिची आईदेखील कुपोषित असेल तर त्या मात्रेचे दूध नवजात बालकाला नीट मिळत नाही मग या बलिकेची पूर्ण वाढ कशी होणार. तिच्या शरीराची प्रतिकारशक्ती कशी विकसित होणार. गर्भाचे नीट पोषण न होणे,पुढे मातेचे दूध योग्य तेवढे न मिळणे बालिका थोडी मोठी झाली की शरीराच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या योग्य आहार न मिळणे यामुळे बालपणीच ती बालिका कुपोषित राहते. मग तारुण्यावस्थेत मध्ये तिच्यामध्ये काय फरक जाणवणार किंवा सुधारणा दिसणार हे सर्व थांबवायचे असेल तर, महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करायला हवी. घरातील गृहिणींच्या आरोग्य सर्वोत्तम असेल तर इतरांकडे ती कडे नीटपणे लक्ष देऊ शकते. परंतु ती जर स्वतः काही समस्यांनी आजारी झाली असेल तर संपूर्ण कुटुंबाचा विस्कळीत होते. महिलांची मानसिकता रोग अंगावर काढण्याची असते. तो आजार बलवला तरच डॉ चा सल्ला घेण्यास तयार होतात त्याही दृष्टीने त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. सध्या स्थितीमध्ये अंगणवाड्यांना मधून योग्य व संतुलित आहार मिळतो तो महिलांनी घ्यावा. महिलांमध्ये स्थूल होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.महिलांनी उपवास कमी करावेत यासाठी हे त्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.योग्य तेवढा व्यायाम योगासने करण्याची गरज महिलांना असते. हे त्यांनी विचारात घ्यायला हवे.मनाच्या आरोग्य जपण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न महिलांनी करावेत.शतावरी,ज्येष्ठमध,चांदन भुईकोहळा, कोरफळ, आवळा अश्या वनऔषधी महिलेने नेहमी बाळगावेत आणि त्याचा योग्य तो उपयोग करावा. ह्या वनौषधी सहज उपलब्ध होणा-या अशा आहेत. खजूर अंजीर केळी द्राक्षे डाळिंब अशा काही फळांचा उपयोग त्यांनी आहारात ठेवावा.बाजरीची भाकरी आणि शरीराला आवश्यक असणारे योग्य भाज्यांचा समावेश आहारात महिलांनी करावा. आरोग्यात काही बिघाड झाल्यास लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

See also  स्वच्छता आणि आरोग्य hand wash benefits

महिलांचे मानसिक विकार

मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे या टप्प्यावर काहीतरी विशिष्ट मानसिक आजार होतात.त्यांना स्त्रियांमधील मानसिक आजार असे म्हटले जाते. या टप्प्यावर स्त्रियांना या कालावधीत मोठे शारीरिक मानसिक व सामाजिक बदल करावे लागतात.त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. शरीरातील प्रत्येक कार्य मेंदूशी निगडीत असल्याने या हार्मोनचे मेंदूवर परिणाम होतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात असे समजले जाते. पौगंडावस्था मध्ये मुलांमध्ये उदासीनता, भित्रेपणा यासारखे आजार मुलांच्या तुलनेने जास्त दिसून येतात. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या थोड्या आधी किंवा त्या दरम्यान लहरीपणा,कंटाळा, त्रास होतात. काही स्त्रियांना हा त्रास तीव्रतेचे होतात. त्याशिवाय शरीर बोजड वाटणे, चिडचिडेपणा,उदास झोपेचा त्रास होतात हा त्रास होताना होताना स्त्रियांमध्ये टोकाचे बदल होतात. गर्भारपणात महिला आनंदी समाधानी असणे अपेक्षित असते. पण काही स्त्रियांना समाधान वाटते कधी कधी स्वतः भीती वाटू शकते. हे सर्व त्रास नंतर वाढतात किंवा नव्याने सुरुवात होते .मासिक पाळी थांबण्याचे वेळी बहुतेक स्त्रिया झोपेच्या तक्रारी अनुभवतात, वारंवार झोप नीट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अशक्तपणा, निरुत्साह,उदासीनता धोका जाणवतो त्याला डोमिनो इफेक्ट्स म्हणतात. अशा झोपण्याच्या तक्रारीमुळे आणि इतर मेंदूतील बदलामुळे स्त्रियांना उदासीनतेच्या आजार ओळखण्याचे किंवा नव्याने होण्याची शक्यता असते. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की या वयात विस्मृतीचे लक्षण असू शकते या सर्व कारणांमुळे या वयात या स्त्रीने झोपेच्या त्रासाची दखल घेऊन वेळेत उपचार केले पाहिजे. स्त्रियांच्या आरोग्यावर आणि स्थैर्यावर तिच्या कुटुंबाच्या भविष्य अवलंबून असते शारीरिक आरोग्यासाठ जसा उपचार सल्ला गरजेचा असतो त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी महत्त्वाची असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x