लसीकरण नंतर या पदार्थांचा आहारात समावेश करा Post Vaccination Nutrition

लसीकरणानंतर या पदार्थांचा आहारात समावेश करा

Post Vaccination Nutrition कोरोना लसीकरण दरम्यान लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत.ज्या आपल्या प्रतिकारशक्ती पातळी वाढवतात आणि या पासून होणाऱ्या साईड इफेक्ट च्या वेदना कमी करतात. कोरोनाविषाणू पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. डॉक्टरांच्या मते लसीकरणाला घाबरू नका, लसीकरण करा असे सांगण्यात येते. काहींचे लसीकरण झाले असेल काहीचे राहिले असेल लसीकरणाबाबत या गोष्टी माहीत असणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

लसीकरण नंतर या पदार्थांचा आहारात समावेश करा Post Vaccination Nutrition

1) तज्ञांच्या म्हणण्यानुसार लसीचा एक दिवस आधी आणि लसीकरणानंतर काही दिवस भरपूर पाणी प्या. हे शरीर हायड्रेटेड ठेवेल आणि त्याचे दुष्परिणाम फारसे होणार नाहीत.

2) लसीकरणानंतर सकस आहार अधिक फायदेशीर आहे.सकस आहार मध्ये राईस,ज्वारी,नाचणी यांचादेखील समावेश करू शकता.

3) हळद ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. हे रामबाण औषध म्हणून कार्य करते. लसीकरणानंतर आपण रात्री हळदीचे दूध देखील पिऊ शकता.

4)लसीकरणानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून अधिकाधिक फळे खा. उन्हाळ्याच्या हंगामात अशी फळे आहेत ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते कलिंगड ,खरबूज,चिक्कू,आंबा,केळी डाळिंब,खाऊ शकता.

5) हिरव्या भाज्यांमध्ये असलेले पोषक घटक प्रतिकारक शक्ती बूस्टर म्हणून कार्य करतात. लसीकरणानंतर हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा यामुळे आपल्याला शक्ती मिळेल.

Leave a Comment

x