जननी सुरक्षा योजना janani suraksha yojna

जनानी सुरक्षा योजना

janani suraksha yojna राज्य शासनाकडून गर्भवती मातांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम आरोग्य खात्याकडून राबविले जातात. यामध्ये प्राधान्याने गर्भवती मातांचे गाव स्तरावर आरोग्य यंत्रणेकडे नोंद व्हावी म्हणून आशा कार्यकर्ती मुळे नोंद करण्याची सोय झाली आहे.आज प्रत्येक गावात आशा कार्यकर्ती ची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गर्भवती मातेची काळजी आणि लोहयुक्त गोळ्या देण्याबाबत सुलभता आली आहे. गर्भवती मातेचा प्रसूती काळ येईपर्यंत आशा कार्यकर्ती आणि गावातील परिचारिका मातेचे वाढते वजन आणि औषधांचा पुरवठा करतात. त्यानंतर गर्भवती मातेची प्रसूती ही संस्थात्मक व्हावी ह्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तयार असते. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण शंभर टक्के पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. संस्थात्मक प्रसूतीमुळे प्रत्येक गर्भवती मातेला प्रसूतीच्या वेळी कोणतीही गुंतागुंत झाल्यास तातडीने जीव वाचवणारे उपाय करणे शक्य होऊ लागले आहेत.त्यासाठी अम्बुलन्स सेवेचा वापर प्रभावी होत आहे.संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढवण्यासाठी गर्भवती मातांना केवळ औषधोपचार व सुरक्षित प्रसूती एवढीच मुद्दे महत्त्वाचे नाही तर प्रसूती झाल्यानंतर तिला चांगले पोषण आहाराची गरज असते.

जननी सुरक्षा योजना

केंद्राच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ आता गरोदर मातांना मिळत आहे दारिद्र रेषेखालील आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील गर्भवती महिला सरकारी दवाखान्यात बाळंत होऊन माता मृत्यू दर कमी होण्यास हातभार लागू शकेल या योजनेमध्ये गरोदर लाभार्थींना रक्कम मिळत आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ते 8 मे 2013 रोजी परिपत्रक काढून सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना तसे आदेश दिले आहेत. janani suraksha yojna २००५-०६ साली सुरू केली. तीस टक्के बाळंतिणी प्रसूतीपश्चात झालेल्या अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील गर्भवती स्त्रियांचे प्रसूती सरकारी दवाखान्यातच व्हावी आणि त्यायोगे मातामृत्यू दर आणि अभ्रक मृत्यु दरात घट व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील सर्व गर्भवती महिलांना तसेच दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना प्रसुतीपश्चात या योजनेचा लाभ मिळतो.शहरी भागात बाळंतीन ना सरकारी दवाखान्यातील प्रसूतीनंतर सहाशे रुपये मिळतात. तर ग्रामीण भागात हे मदत सातशे रुपये आहे. ही मदत लाभार्थी महिलेला सात दिवसाच्या आत मिळावी अशी तरतूद आहे.लाभार्थी गर्भवती महिला घरीच बाळंतपण झाल्यास तिला पाचशे रुपये मदत मिळते. जननी सुरक्षा योजनेचा लाभ आधार कार्ड द्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Comment

x