आरोग्य म्हणजे काय? health education

आरोग्य म्हणजे काय

आरोग्य ही संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूलमानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास का असंतुलन निर्माण झाल्यास सर्व रोग जडतात.जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असते ती आरोग्यसंपन्न मानली जाते. आरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की,त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असते. पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर व मन व्यवस्थित पणे असते म्हणजेच कोणताही रोग,आजार किंवा वेदना नसतात. असे म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट व्यवस्थितपणे करू शकतो. आरोग्य किंवा तब्येत म्हणजे काय तर जेव्हा शरीर मन व समाज हे त्यांनी व्यवस्थित असतात. आरोग्यशास्त्र आरोग्यासाठी शरीर हे निरोगी हवे मनाची उभारी ही असावी आणि सामाजिक आरोग्य स्थिती देखील चांगली असावी. चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन शक्य व्हावे अशी शरीराची आणि मनाची अवस्था. लोकांनी आरोग्यविषयक गैरसमजुती,चुकीच्या सवयी टाकून त्यांना योग्य जाणीव येणे, सवयी बदलणे हे आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. समजा व्यायामाचा प्रसार हे काम मनात धरले तर त्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत याची माहिती देणे. त्यांना आवड निर्माण होईल असे प्रयत्न करणे. प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण हवे असेल तर त्याची सोय करणे वगैरे गोष्टी कराव्या लागतील. उलट नुसते व्यायामाचे महत्त्व सांगितले तर लोक येतील व सोडून देतील.

आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे

आहार

रोजच्या दैनंदिनी मध्ये आपण आहाराला महत्त्व देतो. आहारामध्ये स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिने,लोह इत्यादी घटक तत्वांनी युक्त असा सकस आणि संतुलित आहार घ्यावा. नेहमी पुरेसा आणी ताजा आहार व्यक्तीला मिळाल्याने आरोग्य लाभते.रोजच्या आहारावर आपले आरोग्यविषयक स्थिती अवलंबून असते. त्यामुळे वेळच्या वेळी आहार घेणे अतिशय आवश्यक असते.

स्वच्छता

व्यक्तीच्या खाना-पीना मूळे आणि स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होत असते.आज अस्वच्छते मधून मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादीसारख्या रोग होतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. यामुळे आरोग्य चांगले राहते.

व्यायाम व विश्रांती

व्यायामामुळे व्यक्तीला आपला आरोग्यविषयक दर्जा उंचावतो यतो.नियमित आणि योग्य व्यायाम असल्यास निरोगी आणि दीर्घकालीन सुदृढ आरोग्य लागते. व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्यायामाबरोबरच विश्रांतीला ही तेवढेच महत्त्व आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोन्ही प्रक्रिया आंतरिक संबंध आहे. कारण व्यक्तीचे शरीर म्हणजे हे यंत्र नव्हे. विशिष्ट काळापर्यंत व्यक्ती एखादे काम करू शकते परंतु जास्त केल्यामुळे तिला पुन्हा थकवा येतो तेव्हा विश्रांतीची गरज असते. योग्य प्रसंगी चांगल्या प्रकारचे विश्रांती घेतल्यास विश्रांतीनंतर व्यक्तीचे शरीर उत्साही बनते व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

करमणूक

मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुद्धा लाभते. जीवन सुखी समाधानी बनते. जेव्हा व्यक्ती उदासिन बनतो तेव्हा तो मनोरंजनाचा आधार घेतो. सुयोग्य मनोरंजना मुळे व्यक्तीला शारीरिक मानसिक स्वास्थ्य लागते.

पर्यावरण

सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम आरोग्यावर होत असतो व्यक्तीच्या कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक सामाजिक स्थिती समतोलाचे राहू शकेल असे पर्यावरण लाभल्यास आरोग्याचा दर्जा उंचावतो.

नोकरी/व्यवसाय/काम

साधारणपणे व्यक्ती दोन प्रकारच्या कार्यकर्ते बैठ्या स्वरूपाचे आणि बौद्धिक स्वरूपाची काही कामे फारसे शारीरिक ताण न पडता व्यक्तीला करावे लागतात. काही कामे व्यक्तीला प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करून आपली शक्ती,ऊर्जा खर्च करून करावे लागते. उदाहरणार्थ शेतमजूर, हमाल कारखान्यातील कामगार इत्यादी व्यक्ती शारीरिक कष्टाची कामे करतात. कामाच्या स्वरूपावरुन आरोग्यविषयक समस्या अवलंबून असते. नोकरी करत असताना मानसिक समाधान असणे अत्यंत गरजेचे .मानसिक स्थिती व कामावरील ताणाचा देखील आरोग्यावर परिणाम होत असतो.म्हणून आनंदी वातावरणात काम केल्याने उत्साह वाढतो. कार्यक्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते. जर व्यक्तीस आरोग्य साथ दिली नाही तर त्या व्यक्तीस ते काम करण्यास सांगेल ते काम करता येणार नाही. शरीर व मन निरोगी असणे हे व्यक्तीच्या दृष्टीने चांगले समजले जाते. कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता व्यक्ती आपल्या जीवन जगतात अशाच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबींमध्ये श्रीमंत असते. ज्या व्यक्ती जवळ खूप पैसा आहे रोगाने जर जर केले तर अशा व्यक्ती ना जीवन जगणे कठीण जाते. ज्या देशातील समाज हा निरोगी असतो तो देशाच्या प्रगतीचा शेवटच्या भिंतीवर जाऊन पोहोचतो. होणा-या सर्व बाबींसाठी आरोग्य महत्त्वाचे असते म्हणून म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व आहे. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे म्हणतात ना आपले आरोग्य आपल्या हाती काळजी घ्या स्वतःची.

आरोग्य शिक्षण

लोक एखादी गोष्ट जेव्हा स्वतः करतात,पाहतात तेव्हा शिकणे सहज आणि परिणामकारक होते. केवळ सांगण्याने एवढे काम होत नाही.वर्गातल्याप्रमाणे व्याख्यान देणे हे आरोग्य शिक्षणात फारसे उपयोगाचे नाही. लिहूण्या वाचण्याचे अनेक लोकांना सवय नसते व लिखित गोष्टीपेक्षा पाहणे,करणे हीच स्वयम् शिक्षणाची पद्धत प्रचलित आहे. अर्थात काही ठिकाणी संवाद किंवा पोस्टरचा चांगला उपयोग होऊ शकतो.प्रत्येक माणूस उपलब्ध समोर असलेले माहिती किंवा अनुभवातून स्वतःची कल्पना तयार करते. बऱ्याच वेळा प्रत्येकाची कल्पना थोडे थोडे वेगळे होऊ शकते. ही प्रक्रिया समजणे आणि त्यात मदत करणे हे आपले मुख्य काम आहे. अशा वेळी लोकांना समजेल अशा सोप्या आणि चित्रमय भाषण भाषेचा वापर करावा. शब्दांपेक्षा डोळ्यांनी पाहून चांगले समजते. शब्द वाचण्यापेक्षा चित्र पाहणे हे अनेकपटींनी चांगले माध्यम आहे.शक्य तिथे त्याचा वापर करा, पण त्यासाठी साधी सोपी चित्रे वापरा. अनेक चित्रे लोकांना समजत नाहीत किंवा त्यातून चुकीचा आणि वेगळा अर्थ निघू शकतो. लोकांना समजतील,गैरसमज होणार नाही अशा चित्रकलेच्या वापर करावा. गुंतागुंतीचे किंवा मोठी आकडेवारी देण्याचा मोह टाळावा. आकडेवारी द्यायची असेल त्यांना समजतील अशा पद्धतीने दिले पाहिजे. आपल्या ज्ञानाची कौशल्याची प्रचिती आपल्या वागण्यातून आपोआप सहज दिली पाहिजे. आपण एखाद्या विषयाचे तज्ञ होता असे भासवून आरोग्य शिक्षणाचे काम सोपे होते असे नाही. उलट लोक मनाने लांब राहतात. नम्रता बाळगणे हे जास्त कामाचे,फार अवघड तांत्रिक शब्द वापरण्याचे टाळावे. व्यवहारातले सोपे शब्द वापरावेत न समजणारा एकही शब्द वापरू नये. समजेना असे असे शब्द कानावर आले की लोक अडखळतात व त्यांचे लक्ष उडून जाते. शक्यतोवर त्यांना तुमच्या कार्यक्रमात सामील करून घ्या. त्यांना हाताने गोष्टी करून पाहू द्या. चुका करत शिकू द्या. लोक स्वतः चुका करून शिकतात, तेव्हाच खरे शकतात. चुकायला व ठेवायला पाहिजे. चुकांची भीती घालू नका. लहान मुलांच्या बाबतीत हेच शिक्षणाचे सूत्र आहे. शिकण्या शिकवण्याचा प्रसंग आनंदाचा उत्तसाचा झाला पाहिजे. ज्यात करमणूक ,आनंद,उल्हास आहे अशा गोष्टीशी लोक समाविष्ट होऊन त्या गोष्टी स्मरणात ठेवतात. कुठल्याही प्रकारे त्यांचा अपमान होणार नाही. पीडा होणार नाही असे प्रसंग टाळावेत. शिकण्यात आत्मसन्मान वाढतो, आनंद वाढतो असे दिसले तर ते लोक ते लवकर सामील होते. व्यवहारातले दाखले द्या. जीवनाशी संबंध असलेल्या विषयाशी ते लवकर एकरूप होतात. दूरच्या गोष्टी टाळा. त्यांच्या मनात तुमच्या सांगण्यावरून काही प्रतिमा चित्रे निर्माण झाली पाहिजेत. ती त्यांच्या जीवनात अनुभवायला मिळत असतील तरच तुमच्या तारा जुळतील.लोकांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते फक्त त्यांना अनुभव सांगायला पुरेशी संधी वेळ जागा द्या. वैद्यक शास्त्रात लोकांनी भरपूर भर घातली आहे .विशेषता प्राथमिक आरोग्य सेवांच्या बाबतीत तर ते अनेक चांगल्या सूचना करू शकतात. बाळाचे पोषण चांगले कसे करता येईल हे आयांना विचारा. त्या कितीतरी कल्पना सांगतील,अडचणी सोडवतील. चांगल्या सवयी लावून घेणे किंवा वाईट सवय टाळणे या दोन्ही बाबतीत आपले वर्तन स्वच्छ पाहिजे तर तुमच्या शब्दांना वजन येईल.या बाबतीत जेवढा प्रामाणिकपणा दाखवाल.तेवढेच तुमच्या शब्दाचे महत्त्व आहे. सुरुवात स्वतःपासूनच करा. संदेश लाखमोलाचे पण सांगण्याची पद्धतही तशीच पाहिजे. तुम्ही सांगताय ते माहिती फार मोलाची असेल पण ती समजेल अशा पद्धतीने सांगितले गेली नाही तर फारसा उपयोग होणार नाही. सांगण्याच्या पद्धतीवर संवाद कौशल्य यावरच बरेच अवलंबून असते. त्याशिवाय यश मिळणार नाही.

आरोग्य कार्यकर्त्यांची भूमिका

गावोगावी आरोग्य कार्यकर्ते असतात ते दुखण्यावर इलाज करतात.जरा अवघड किंवा गंभीर आजार असल्यास डॉक्टरांकडे पाठवतात .हे काम आपणही करू शकतो साध्या आणि मध्यम आजारांना गावातच बरे करण्याची कला आपण शिकून घेतली पाहिजे.गंभीर आजार असल्यास योग्य ती प्राथमिक मदत करून आपण त्यांना पुढच्या उपचारासाठी वेळेस पाठविले पाहिजे. गंभीर आजार आकस्मिक असतील उदाहरणार्थ सर्पदंश किंवा दीर्घकाळ चालणारी असतील उदा. क्षयरोग तर लवकरात लवकर त्यांना पुढच्या उपचारासाठी पाठविले पाहिजे. या आजारात उशीर झाला तर या कामाचा काही उपयोग होणार नाही. अपघातात योग्य तो प्रथमोपचार करणे हे आपले महत्वाचे कर्तव्य आहे. एक्सीडेंट मध्ये जखमा झाल्या असतील, सर्पदंश व भाजने, विंचूदनश वगैरे अनेक अपघात घडत असतात. यात नेमके काय करायचे हे वाचून ठेवा किंवा शिकून घ्या. योग्य प्रथम उपचार दिले तर समोरच्या व्यक्तीच्या प्राण वाचू शकतील. जे आजार टाळण्यासाठी आहेत त्यांचा योग्य तो प्रतिबंध करण्याचा प्रयत्न चालू ठेवा. यात गावकरी, पंचायती, सरकारी कर्मचारी, शिक्षक वगैरे जे मदत करतील त्यांची मदत घ्या. अशा कामांची यादी तयार करा उदाहरणार्थ पाणी शुद्ध ठेवणे,पाणि साचू न देणे,संडास चा प्रसार, मच्छरदाणीचा वापर, नखे कापणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, स्वच्छता ठेवणे, बाळाचे लसीकरण,बालकांचे आरोग्यविषयक तक्ते, इत्यादी करण्यासारखे कामे आहेत. हे काम फक्त आरोग्य कार्यकर्त्याचे नाही तर इतरांची सुद्धा यामध्ये मदत घ्यावी किंवा त्यांना मदत करावी आरोग्य शिक्षणाचा प्रसार करा. शाळांमध्ये.शिक्षकांमध्ये यासाठी विशेष कार्यक्रम घ्यायला पाहिजे प्रत्येक गटाच्या दृष्टीने काही ना काही विषय महत्त्वाचा असतो. दारू धुम्रपान वगैरे विषय मोठ्या गटांमध्ये घेतले पाहिजेत. वेळ, संधी मिळाली तेव्हा आरोग्य शिक्षण चालू ठेवा. याचे पाढे मोजता येत नाहीत. आणि लगेच दिसत नाहीत पण नुसत्या औषध गोळ्या पेक्षा हे का महत्वाचे आहे स्थानिक साधन सामग्रीचा वापर करा.

आरोग्य संवादाच्या पद्धती

गटचर्चा

गटचर्चा ही आरोग्य संवादाची एक प्रभावी पद्धत आहे त्याला फारसे साधने लागत नाही. गटात बोलण्याचा विषय आणि त्यासाठी वापरायची संवादाची पद्धत याचा मेळ घालता आला पाहिजे. हा मेळ जमला नाही तर योग्य परिणाम साधला जाणार नाही.उदाहरणार्थ सर्वांनी संडासचा वापर करावा असे ठरवले तर जर कोणी म्हणत असेल की संडास वापरायला पुरेसे पाणी नसते, तर त्यावर आपण सर्व बाजूंनी विचार करून तोडगा शोधायला हवा. वाद विवादाने प्रश्न सुटत नाही,चर्चेने सुटतात. बदल हा नेहमीच सावकाश होतो. पण प्रत्येक समाजात नवीन कल्पना स्वीकार करणारे लोक असतातच. आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे .कधीकधी नवीन पिढी नविन कल्पना लवकर स्वीकारतात.जुन्या पद्धतीचे सवय असल्यामुळे त्या सोडून नवीन पद्धतीचे अवलंब करणे बरेच अवघड जातात. नवीन पद्धतीने जुळवून घेताना काही तडजोड करावी लागते. काय चर्चा झाली आणि काय ठरले याच्या शेवटी आढावा घेणे जरुरीचे आहे.

प्रभात फेरी

प्रभात फेरी हा एक शाळेतल्या मुलांच्या मदतीने पाडता येणारा आरोग्याची माहिती देणारा हा एक उत्तम उपक्रम आहे .शाळेतील मुले उद्याचे नागरिक असतात. त्यांच्यात आरोग्याची जाणीव निर्माण झाली तर त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना होईल. प्रभात फेरी मधून मुलांकडून या ना त्या पद्धतीने माहिती ही इतरांपर्यंत पोहोचणारच.मुले आनंदाने हे काम करतात आणि त्यामुळे पालकांना हा संदेश अधिक आवडतो. फारसा खर्च न करता केवळ प्रभात फेरी तून आपण आरोग्य विषयी माहिती बरीच माहिती देऊ शकतो.शाळकरी मुलांना योग्य असा आरोग्याचा विषय निवडा. आजारांचा विषय शक्यतो नको उदाहरणार्थ क्षयरोग, एड्स, कुटुंबनियोजनाचे विषय नकोत.मात्र धुम्रपानाचे दुष्परिणाम हा चालेल तसेच विषय समजायला सोपा असावा. किचकट नको स्वच्छता, पोषण,बालमजूर इत्यादी विषय चांगले योग्य विषय निवडताना शिक्षकांचा सल्ला घ्या. परीक्षेचे दिवस टाळा. शिक्षक मुला मुलींच्या मदतीने सूचनाफलक आणि घोषणा तयार करा. याकरता लागणारे साहित्य शाळेत मिळू शकेल एकाच विषयावर तीन-चार वेळा त्यांच्या वेगवेगळे फलक तयार करा समजा मलेरियाचा प्रतिबंध हा विषय असेल तर, त्यावर ताप, उपचार,गप्पी मासे,परसबाग फवारा मारणे असे फलक तयार होऊ शकतात. फेरीच्या एक दिवस आधी शिक्षक, मुला-मुलींची चर्चा बैठक घ्या.त्यात त्यांना विषयाचे महत्त्व पटवून द्या. तसेच कोणता संदेश पोहोचवायचा आहे चर्चेतून सांगा. फक्त सकाळचा वेळ वापरा आणि अभ्यासात व्यत्यय येणार नाही हे काळजी घ्या. गावातील मुख्य रस्त्यावरून फेरी घेऊन जा. खूप लांब नको ही फेरी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून वाईट आरोग्य पद्धतीच्या विरुद्ध आहे हे लक्षात ठेवा. परीक्षेचे दिवस टाळा आरोग्य देण्यासारख्या विशेष देण्याचा वापर करता येईल मुलांना खूप वेळ उन्हात बसू नका. काही मुलांना यामुळे चक्कर येतो, त्याने इतर समस्या निर्माण होतील.

Leave a Comment

x