cancer in marathi,कर्करोग कारणे, लक्षणे, उपचार,cancer,symptoms,treatment

Cancer in marathi,कर्करोग जागृकता काळाची गरज

जनसामान्यांना कर्करोग कसा होतो. कर्करोगाची संभाव्य कारणे काय, याचे निदान कसे करायचे व कर्करोगावर कोणते उपचार उपलब्ध आहेत.याबाबत आज परिपूर्ण माहिती असणे काळाची गरज आहे. आज ज्याप्रमाणे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि भविष्यामध्ये कर्करोग आपल्याला होऊच नये यासाठी घ्यावयाची काळजी, म्हणजेच कर्करोगाविषयी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आजही कर्करोग म्हणजे मृत्यू हे समीकरण लोक मानतात. परंतु हे जरी पूर्वी सत्य असले तरी आज तशी परिस्थिती नाही. आज कर्करोगावर चांगले उपचार उपलब्ध आहेत व कर्करोग सुरुवातीच्या काळात ओळखला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

Cat Meaning Information in Marathi मांजर

हे जनतेला पटवून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या समजुतीमुळे आपण अनेक अयोग्य व अनावश्यक गोष्टींना बळी पडू लागलो आहोत त्यामुळे कर्करोग व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. चुकीची जीवनशैली तसेच त्यामुळे उद्भवणारे तंबाखूसेवन सारखे घातक व्यसने व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणामुळे भारतात या रोगाचे प्रमाण वाढत आहे. हे सर्व कारणे भारतात हे सर्व कारणे टाळता येण्यासारखी असल्याने आपण 60 ते 70 टक्के कॅन्सर टाळू शकतो. भारतामध्ये प्रत्येक वर्षी कॅन्सरने पीडित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

कर्करोगाची आजची स्थिती

हल्ली प्रत्येक कुटुंबातील एखादा सदस्य किंवा ओळखीच्या कोणीतरी कर्करोगाने पीडित असल्याचे अनुभव बरेच जण सांगतात. भारतामध्ये साधारणपणे पंचवीस लाख कर्करोगाने पीडित रुग्ण असल्याचे अनुमान आहे. दरवर्षी रुग्ण संख्या मध्ये वाढ होत आहे. भार तातील कर्करोगाने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत विचार केल्यास भारताचा तिसरा क्रमांक लागतो.प्रथम क्रमांकावर अमेरिका असून दुसऱ्या क्रमांकावर चीन हा देश आहे. त्यामुळेच कर्करोगाबाबत जनतेला माहिती होण्याकरता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारे दिनांक सात नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी राष्ट्रीय कर्करोग जागृकता दिन म्हणून साजरा करण्याच्या करण्यात आले आहे.

कर्करोगाबाबत जनसामान्यांना कर्करोग कसा होतो कर्करोगाचे संभाव्य कारणे काय त्याचे निदान कसे करायचे व कर्करोगावर कोणते उपचार उपलब्ध आहेत याबाबतचे शास्त्रोक्त माहिती करून देणे आवश्यक आहे. याबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत त्याही दूर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. सात नोव्हेंबर रोजी आपण राष्ट्रीय कॅन्सर जागृतता दिवस म्हणून पाळला असलो तरी, वर्षभर आपण सर्वांनी जनतेला व्याख्याने भिंती चित्र, प्रदर्शने,चित्रफित दाखवून जनजागृती करून कॅन्सरबाबात शास्त्रोक्त माहिती करून देणे व जागृत करणे आवश्यक आहे.

शासन योजना

शासनातर्फे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या रोगावर गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध आहेत.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.ह्या योजनेअंतर्गत नावाजलेले रुग्णालय जोडले गेलेले आहेत.

त्याद्वारे पेशंट जर त्याचा सर्व उपचाराबाबत डाटा या अशा नेटवर्क वेबसाईटवर फिट केला तर त्यांना देशातील नामांकित कॅन्सर तज्ञांचे त्यांच्या आजाराबाबत सेकंड ओपिनियन घरबसल्या मिळू शकेल व त्यांना आपल्या उपचार व्यवस्थित चालू आहेत का, पुढे काय उपचार घेणे जरुरीचे आहेत, अशा अनेक शंकांचे समाधान होण्यास मदत होईल. त्यामुळे पेशंटचा वेळ व पैसा यात बचत होईल. भारतामध्ये मुखाचा कर्करोग म्हणजे तोंडाचा कर्क

कर्करोग कोणाला होतो?

पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो. तसेच स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सर्वाधिक प्रमाणात दिसून येतात. एक चांगली गोष्ट ही म्हणता येईल की हे तीनही कर्करोग सोप्या स्क्रीनिंग तपासणी करणे योग्य आहेत जसे की नियमित मुख किंवा तोंडाच्या कर्करोग साठी गळ्याची तपासणी तसेच स्तनांचा कर्करोग यासाठी महिलांनी स्वतःच्या करावयाचे मासिक सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ॲप्स… कर्करोग प्राथमिक अवस्थांमध्ये ओळखता आला तर यावर चांगला उपाय करता येऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

म्हणूनच कॅन्सरचे निदान सुरुवातीला होण्यासाठी खालील दिलेल्या कॅन्सरच्या होण्याची लक्षणे जनतेला सांगून आपण जागरूक करू शकतो. कर्करोग असेल तर पुढील काही लक्षणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.जसे की वजन एकदम कमी होणे. यामध्ये विशेषता उतारवयात वजन कमी होते. अचानकपणे रक्तपांढरी होणे,भूक मरणे म्हणजे भूक न लागणे शरीरामध्ये कोठे गाठ किंवा बरा न होणारा महिलांमध्ये उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर अचानक जास्त रक्तस्त्राव उदाहरणार्थ गर्भाशयाचा कर्करोग स्तनांमध्ये गाठ येणे म्हणजे स्तनाचा कर्करोग पुरुष आणि स्त्री यांचा आवाज बदलणे किंवा त्रास होणे म्हणजे स्वरयंत्राचा कर्करोग. खोकल्यातून किंवा बेडकातऊन रक्त पडणे यालाच फुफ्फुसाचा कर्करोग म्हणतात खातांना अडकल्यासारखे वाटत राहणे अन्ननलिकेचा कर्करोग.

कर्करोगाची लक्षणे

तोंडात कोठे बरे न होणारा व्रण गाठ तयार होणे यालाच आपण तोंडाचा कर्करोग म्हणतो. लघवीतून कारणाशिवाय अचानक रक्तस्राव मूत्राशय कर्करोग सोच विसर्जनाच्या सवयी अचानक बदललेल्या बद्धकोष्ठतेचा तक्रार त्याला जपून मोठ्या आतड्याचा कर्करोग सुद्धा म्हणतो कोठे नये उदाहरणार्थ ना खेड्याला गर्भाशय ह्यामधून अचानक कारणाशिवाय रक्तस्त्राव ह्याला रक्तापेक्षा कर्करोग सुद्धा म्हणतात. कॅन्सर हा एक आजार आहे ज्यामध्ये शारीरिक ,मानसिक,सामाजिक, आर्थिक अशा अनेक पातळ्यांवर रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मुकाबला करावा लागतो.

म्हणूनच जनतेला आपण कॅन्सर बाबत शास्त्रोक्त माहिती देऊन जागृत करणे आरोग्य सेवा देणाऱ्या सर्वांचे कर्तव्य आहे. सजग सुयोग्य माहिती असलेल्या समाजाच्या मदतीने आपण कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर विजय मिळू शकतो. ह्याच कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी जीवनशैली मध्ये पोषक आहार या गोष्टीचा अंतर्भाव करावा लागेल याची माहिती जाणून घेऊ.कॅन्सर होऊ नये यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार घ्यावा.

न होण्याकरिता काय खावे?

दररोज कमीत कमी चारशे ते पाचशे ग्राम ताजी फळे आणि भाज्या खावेत आहारामध्ये तंतूमय जसे सलाड गाजर टोमॅटो मुळा कोथिंबीर लिंबूवर्गीय फळे हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करणे अतिशय आवश्यक राहते. भरपूर स्वच्छ पाणी प्यावे तसेच दर्जेदार प्रथिने उदाहरणार्थ शेंगदाणे सोयाबीन अंडे यांचा आहारात समावेश करावा. चिकन व मासे खाणे चांगले. रोज नियमितपणे व्यायाम, योगा मेडिटेशन करावे कोणतेही मैदानी खेळ जसे सायकलिंग,पडणे इत्यादी चा अंतर्भाव करावा रोज साधारणपणे चार ते पाच किलोमीटर म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे चालणे हा व्यायाम उत्तम.

खालील काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टाळाव्यात. तांबड्या मास,प्रक्रियायुक्त मास,शर्करायुक्त प्रक्रियायुक्त फळांचा रस, डेरी, बेकरी उत्पादने, तळलेले मसालेदार पदार्थ,कॅन्सर टाळण्यासाठी आहारामध्ये योग्य आहारामध्ये योग्य नियोजन करणे .कॅन्सर हा असा आजार आहे त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक अशा अनेक पातळ्यांवर रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना मुकाबला करावा लागतो.म्हणूनच जनतेला आपण सर्व शास्त्रोक्त माहिती देऊन जागृत करणे आरोग्य सेवा देणाऱ्या सर्वांचे कर्तव्यसमजून सुयोग्य माहिती असलेल्या समाजाच्या मदतीने आपण कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर विजय मिळू शकतो.

Leave a Comment

x