वेगवेगळ्या भांड्यामध्ये आहार किंवा जेवण घेण्याचे आरोग्यदायी फायदे
तांब्याच्या benefits dinner with various swallow भांड्यात पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर आहे.परंतु हे माहित आहे का इतर भांडी देखील आहे ज्याचा वापर केल्याने आपल्या आरोग्यास फायदा मिळतो चला तर जाणून घेऊया कोणत्या भांड्यामध्ये जेवण केल्याने आरोग्यास फायदा होतो.
काश्याची भांडी
काश्याच्या भांड्यात जेवण केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे मेंदू तिक्ष्ण होतो. रक्तविकारात सुधारणा होते. भूक देखील लागते. परंतु लक्षात ठेवा की काश्याच्या भांड्यात आंबट काही घेणे टाळावे.
एल्युमिनियम ची भांडी
आयुर्वेदानुसार या भांडी जेवण करू नये. यामुळे हळूहळू हाडे कमकुवत होतात आणि पचन तंत्रावर देखील प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून या भांडत जेवू नये.
तांब्याची भांडी
या भांडीत सकाळी उठून पाणी प्यायल्याने आरोग्यास फायदा होतो. यामुळे पोटाचे विकार जसे की ग्यासची समस्या होण दूर केले जाऊ शकते.या भांड्यातून पाणी पिल्याने स्मरण शक्ती वाढते आणि लिव्हरचा त्रास दूर होतात बरेच लोक पाण्यात तुळशीचे पाने घालून देखील पाणी पितात.
लोखंडी आणि स्टीलची भांडी
प्रत्येकाला हे माहीत आहे की लोखंडी भांड्यात अन्न शिजवणे आणि खाल्ल्याने आयर्नची कमतरता दूर केली जाऊ शकते. यामध्ये तयार अन्न खाल्ल्याने ऊर्जेची पातळी व्यवस्थित राहते.तथापि मासे, अमलीय अन्न लोखंडी भांड्यात शिजवू नये. अशा प्रकारे स्टील ने बनवलेले भांडित देखील जेवल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही.
मातीची भांडी
सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे. मातीने तयार केलेली भांडी असे म्हणतात की, या मध्ये अन्न शिजवल्यावर आणि खाल्ल्यावर शरीराला काहीच नुस्कान होत नाही.शहरात ह्याचा वापर कमी प्रमाणात आढळतो परंतु गावात आज देखील या भांडी चा वापर सर्रास करतात. यामध्ये अन्न शिजवायला वेळ लागतो परंतु अन्न पौष्टिक असते.
पितळेची भांडी
पितळेच्या भांड्यात देखील जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते.
सोनं आणि चांदीचे भांडे
मौल्यवान असल्यामुळे हे कमी प्रमाणात वापरतात असं म्हणतात की सोन्याच्या भांड्यात जेवण केल्याने शरीर बळकट आणि दृढ होते.चांदीच्या भांड्यात जेवल्याने शरीराला थंडावा मिळतो मेंदूत तीक्ष्ण होतो.
Nice