आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू ॲप वर Aayushyman Bharat

आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू ॲप वर

केंद्र सरकारने आणखी एक डिजिटल पाऊल उचलले आहे.ते म्हणजे आरोग्य सेतू ॲप(Aaarogy setu app) वर आयुष्यमान भारत (Aayushyman Bharat)योजनेचे युनिक क्रमांक जोडता येईल.

आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू ॲप वर Aayushyman Bharat

जे आधीपासून आरोग्य सेतू अँप वर आहेत त्यांना 14 अंकाचा आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट क्रमांक मिळेल. या क्रमांकावरून आयुष्यमान भारत योजना(Aayushyman bharat yojana)अंतर्गत उपचार घेतलेल्या जुन्या आणि आता चे मेडिकल रिपोर्ट मिळतील. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सध्या 16.4 कोटी क्रमांक आहेत या सर्वांना आरोग्य सेतू ॲप वर जोडण्यात येणार आहे असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

आपल्या आधीच्या मेडिकल इतिहासामध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट,प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट हॉस्पिटल रेकॉर्ड यांचा समावेश असेल. आरोग्य सेतू वापरणारे 21.4 कोटी यूजर्स ला आता आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट क्रमांक मिळेल.

नोंदणी कोणाची होणार?

असे कामगार ज्यांची वय 16 ते 59 वर्षे आहे आणि कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था किंवा राज्य विमा महामंडळ चे या सुविधांची लाभार्थी नाहीत. असे कामगार जे आयकर भरण्यासाठी पात्र नाहीत. असे कामगार जे सरकारी कर्मचारी नाहीत. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन(Aayushyman bharat digital mishan) अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी एक युनिक हेल्थ कार्ड तयार केला जातो हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असेल आणि आधार कार्ड सारखे दिसेल आधार कार्ड मध्ये जसा नंबर असतो तशाच प्रकारे हेल्थ कार्डवर एक नंबर असेल. ज्याच्या आधारावर व्यक्तीची ओळख आरोग्य क्षेत्रात सिद्ध होईल हा क्रमांक आता आरोग्य सेतू यावरून जोडला जाणार आहे. म्हणजे तुमच्या आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू अँप मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे?

ज्या व्यक्तीचे युनिक हेल्थ कार्ड नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर घेतला जाईल त्याच्या मदतीने हे हेल्थ कार्ड तयार केले जाईल. ह्यासाठी सरकारद्वारे एक आरोग्य प्राधिकरण स्थापन केले जाईल जे व्यक्तीच्या आरोग्याचे संबंधित सर्व प्रकारचा डेटा गोळा करेल.अशा प्रकारे आरोग्यचि कुंडली आता आरोग्य सेतू अँप वर मिळेल.

Leave a Comment

x