aurvedik upchar in marathi,आयुर्वेद aurveda nutrition opporcuinestic infection

आयुर्वेद

आयुर्वेदाची उत्पत्ती भारतात पाच हजार वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले जाते. आयुर्वेद हे भारतीय प्रांतातील प्राचीन औषधी संस्था आहे. आयुर्वेद हा शब्द संस्कृतीच्या “आयुस”म्हणजे जीवन आणि” वेद “म्हणजे विज्ञान या दोन शब्दाचे संयोजन आहे.म्हणूनच आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान आणि इतर वैद्यकीय शास्त्र पेक्षा जास्त आयुर्वेदाचा जोर रोगांवर उपचार पेक्षा निरोगी जीवनावर जास्त आहे. आयुर्वेदाचा मूळ उद्देश उपचार प्रक्रियेला वैयक्तिक करण्याचा आहे. आयुर्वेदाप्रमाणे मनुष्याचे शरीर हे चार मूळ तत्त्वांवर आधारित असते दोष,धातू ,मल, आणि अग्नी आयुर्वेदामध्ये शरीराच्या या चार मुल तत्त्वांचे फार महत्त्व आहे. ह्यांना मूळ सिद्धांत किंवा आयुर्वेदिक उपचारांचे मूलाधार असे म्हणतात.

धातु

शरीराला आधार देणारे घटक म्हणजे धातू अशी धातूची व्याख्या करता येते. शरीरास सात प्रकारच्या मांसपेशी यंत्रणा कार्यरत असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे शरीरात रक्त, रस, रक्त मांस पेशी, चर्बी अस्थी व अस्थीमज्जा यांचे दर्शक आहेत.धातु शरीराला फक्त मूलभूत पोषण देतात आणि ते मनाचे वाढ आणि संरचना यामध्ये यासाठी महत्त्वाचे आहेत.

अग्नी

शरीरातील सर्व चयापचयी क्रिया आणि पाचनीय गतिविधी शरीरात शरीराच्या जैविक आगीमुळे, अग्नीमुळे घडत असतात.अग्नी म्हणजे शरीरातील एंझाईम्स म्हणू शकतो जे शरीरात जठारएलिमेंट्री कॅनॉल यकृत आणि उत्तक कोशिकेत असतात.

मल

मल म्हणजे कचरा किंवा घाण. शरीराच्या त्रिनेत्र म्हणजे दोष आणि धातू मध्ये हे तिसरे नेत्र होय मला चे तीन प्रकार असतात जसे विष्ठा,मूत्र आणि घाम मल मुख्यता शरीरातील निरर्थक उत्पाद आहे. मलविसर्जन हे प्रत्येकाच्या शरीराच्या नियमित कार्यासाठी महत्त्वाचे आहे.मल चे दोन मुख्य स्वरूप आहेत मला आणि किट मल म्हणजे निरर्थक उत्पादने किट म्हणजे धातूंचे निरर्थक उत्पाद.

दोष

वात,पित्त, कफ,या दोषांचे तीन महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे जे एकत्रितपणे अपचयी चयापचय नियंत्रित करतात या तीन दोषचे मुख्य कार्य पचन झालेल्या पदार्थाचे प्रतिफल शरीरात सर्वत्र पोहोचणे असे आहे. ज्यामुळे शरीरात मांसपेशी च्या निर्माण कार्यास मदत होते. दोषच्या कोणत्याही बिघाडामुळेमुळे शरीरात रोग निर्माण होतो.

पंचमहाभूते

आयुर्वेदाप्रमाणे सूर्य मंडळातील कोणत्याही वस्तू आणि मानवी शरीर हे पंच तत्वांचे बनलेले आहे. जसे पृथ्वी, पाणी आग हवा आणि पोकळी या सर्व तत्त्वांचे शरीराचे मुख्य ढाचा आणि त्याच्या आवयावा प्रमाणे वेगवेगळ्या कार्यात गरज आणि आवश्यकतेनुसार संतुलित संक्षेपण असते. शरीराच्या ढाचयची वाढ आणि विकास पोषणावर अवलंबून असतो,म्हणजे अन्न. अन्न देखील पाच तत्त्वांचे बनलेले आहे. जे अग्निच्या कार्यानंतर शरीराच्या सम तत्वाचे भरनआणि पोषण करते. शरीराचे उतके सौ रचनात्मक आहेत आणि भावना ह्या मानसिक संस्था ज्या वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या क्रम परिवर्तनाने किंवा संयोजनाने उत्पन्न होत असतात.

शरीराची स रचना

आयुर्वेदात जीवन म्हणजे शरीर ज्ञान,मन आणि आत्मा यांचे संयोजन होय. जिवंत मनुष्यतीन मनोवृत्ती म्हणजे वात पित्त आणि कफ सात मूलपेशी म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र आणि शरीराच्या निरर्थक उत्पादन जसे विष्ठा, मूत्र आणि घाम यांचा समूह आहे. म्हणून संपूर्ण शरीर आधार म्हणजे मनावृत्ती सात मुलपेशी आणि शरीरातील निरर्थक उत्पाद याचे एकत्रीकरण आहे. शरीराचीवाढ आणि झीज याचे घटक हे त्या अन्नावर अवलंबून असते जे थे शरीर खाते आणि त्याचे रूपांतर मनोवृत्ती,सात मूळ पेशी आणि शरीरातील निरर्थक उत्पाद यात होते अण्णा खाने शोषण आत्मसात आणि चयापचय याच्यावरून शरीराचे आरोग्य आणि रोग अवलांबून असतात ते मानसिक स्तरांवर आणि अग्नी यावर देखील अवलंबून असतात.

आरोग्य आणि आजार

संपूर्ण शरीराच्या संतुलित व्यवस्थेच्या उपस्थिती आणि अनुपस्थिती वर आरोग्य किंवा आजार अवलंबून असतात. दोन्ही आंतरिक किंवा बाहय कारक नैसर्गिक संतुलनात अशांतता निर्माण झाल्याने रोग उत्पन्न करतात. ह्या नैसर्गिक संतुलनात अशांतता ही आहार अविवेक अवणचणीय सवयी आणि आरोग्यवर्धक नियम न पाळल्यामुळे येऊ शकते. आसामान्यता अनुचित शारीरिक व्यायाम किंवा इंद्रियांचा आणि मनाचा अनियमित वापर यामुळे देखील नैसर्गिक संतुलनात अशांतता निर्माण होऊ शकते. नैसर्गिक संतुलनात अशांतता निर्माण झालेल्या शरीरात शांतता अन्यण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवून सवयी आणि जगण्याच्या पद्धतीत बदल करून औषधोपचारांनी आणि रसायन आणि पंचकर्म चिकित्साने उपचार केले जातात.

निदान

आयुर्वेदामध्ये रुग्णाचे नेहमी संपूर्ण निदान केले जाते. रुग्णांच्या शारीरिक विशेषता शारीरिक आणि मानसिक स्वभावाचे व्यवस्थित टिपण केले जाते तसेच इतर घटकांचा सुद्धा अभ्यास केला जातो असे शारीरिक मनोवृत्ती ज्या जागेवर झालाआहे ती जागा रुग्णाची प्रतिकारशक्ती आणि जीवनबल त्याची दिनचर्या आहाराचा सवयी चिकित्सीय अवस्थांची घनता पचनशक्ती आणि रुग्णाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय जीवनाचे संपूर्ण माहिती घेतली जाते. आयुर्वेदामध्ये साधारण शारीरिक परीक्षण केले जाते, तसेच नाडी परीक्षण सुद्धा केले जाते, मल मूत्र परीक्षणावर सुद्धा भर दिला जातो. डोळे आणि जिभेचे सुद्धा परीक्षण केले जाते कानाने कातडीचे परीक्षण करताना स्पर्श चाचणीचा समावेश केला जातो

उपचार

आरोग्यता आणि आरोग्य सेवेत वाढ, रोगापासून बचाव आणि आजारावर उपचार हा एकूण आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे. साधारण चिकित्सात्मक दृष्टिकोन असा आहे की उपचार आरोग्य देतो तो अचूक असतो आणि खरा वैद्य तो जो रुग्णाला रोगापासून मुक्ती देतो.रोगाच्या उपचारांमध्ये पंचकर्म प्रक्रिया औषधे उपयुक्त आहार गतिविधि आणि आहारात संतुलन आणि शारीरिक क्षमतेस मजबूत करणे यासारख्या उपायांद्वारे पुढील काळात रोग होणार नाही किंवा होण्याची शक्यता कमी होऊन त्यापासून बचाव होऊन, शरीराच्या ढाच्यात किंवा शरीरातील कोणत्याही भागात असंतुलन निर्माण करणाऱ्या कारकापासून बचाव केला जातो.साधारण कोणत्याही उपचार पद्धतीत औषधे, विशेष आहार आणि ठराविक दिनचर्या गतिविधीचा समावेश असतो.

या तीन उपायांचा प्रयोग दोन प्रकारे केला जातो. उपचाराच्या एका दृष्टिकोनात हे तीन उपाय प्रमाणशीर पणे कारकांचा आणि रोगांच्या विपणन या लक्षणांचा प्रतिकार करतात व रोगाची तीव्रता कामे करतात दृष्टिकोनातून दुसऱ्या दृष्टिकोनात औषधे विशेष आहार आणि ठराविक दिनचर्या या तीन उपचार पद्धतीने प्रमाणशीर होणार कारकांचा आणि रोगांच्या विभिन्न लक्षणांचा प्रतिकार करणाऱ्या या रोगाची तीव्रता कमी करणाऱ्या कारकावर भर दिला जातो. उपचार सफल करण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहे ते म्हणजे चिकित्सक औषधे ,उपचाराक ,रोगी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिकित्सक जो पवित्र आणि मानवी समाज असलेल्या व तांत्रिक रित्या शास्त्रक्त ज्ञानी कुशल असला पाहिजे. चिकित्सकाने त्याच्या ज्ञानाचा वापर विनम्रतेने आणि बुद्धीने व मानवतिने केला पाहिजे.

त्यानंतर महत्त्वाच्या औषधी हे चांगल्या प्रतीचे बहुउपयोगी वाढीव आणि अनुमतीची प्रक्रिया पासून तयार केलेले आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावे प्रत्येक सफल उपचाराचे तिसरा घटक म्हणजे उपचारकांची भूमिका आहे.ज्याला उपचार याचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे त्याच्या विषयात पारंगत असावा व स्नेहपूर्ण, पूर्ण बुद्धिमान, स्वच्छ नेट नेटका दिलासा देणारा असावा. चौथा घटक म्हणजे रुग्ण स्वतः जो चिकित्सकच्या निर्देशांचे पालन करणारा आज्ञा कारीआणि सहकार्य देणारा तसेच होणारा त्रास नमूद करण्यास सक्षम आणि उपचारांसाठी लागणारे सर्व सहकार्य देणारा असावा. आयुर्वेदाने रोगाचे चरण आणि घटनांपासून तर रोगाच्या अंतिम टप्प्यात पर्यंतचे एक व विश्लेषणात्मक विवरण विकसित केले आहे. यामुळे अव्यक्त लक्षणे स्पष्ट होण्याआधीच रोगाचे संभाव्य सुरुवात लक्षात येऊ शकते व या प्रणालीस एक अतिरिक्त लाभ प्राप्त होतो.यामुळे वेळेआधीच उचित आणि प्रभावी पाऊल उचलण्यास मदत होते आणि या चिकित्सा पद्धतीचे निवारा भूमिका फार वाढते.

संसर्गजन्य रोग आणि आयुर्वेद

जे साथीचे आजार आहे,त्याचे एकापासून दुसऱ्याला संक्रमण होते असे आयुर्वेद म्हणतो. संसर्गजन्य रोग एकापासून दुसऱ्याला होता तसा आयुर्वेदातील सुश्रुत संहितेत स्पष्ट उल्लेख आहे.त्यामुळे केवळ त्या वरील औषध उपचार करून चालणार नाही तर त्याचा प्रसार थांबवण्यासाठी चे उपाय देखील तेवढेच अधिक महत्त्वाच्या ठरतात. प्राचीन काळी कोणत्याही भौतिक रासायनिक आणि जीवशास्त्रीय अद्यावत सुविधा उपलब्ध नसताना सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन आयुर्वेदाने सांगितलेले.प्रसाराचे मार्ग हे नक्की आजही जसेच्या तसे लागू पडतात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणे वारंवार एकमेकांच्या शरीराचा एकमेकांना स्पर्श होणे, एकमेकांच्या वारंवार संपर्क येणे, एकत्रित वारंवार जेवण केले जाणे, वारंवार एकत्र झोपणे, एकमेकांचे कपडे, सौंदर्यप्रसाधने, याच्या आदान-प्रदान केले जाणे, त्यामुळे सांसर्गिक आजार होतात .त्यामध्ये जन्तु संसर्ग, त्वचारोग, डोळे येणे, गोवर, खाजणे इत्यादी आजारांचा समावेश होतो.

भारतीय परंपरेप्रमाणे आपले लांबूनच हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत अतिशय योग्य आहे.त्यामुळे संसर्ग जंतू संसर्ग टाळता येतो. केवळ स्वाइन फ्लूच्या काळातच नव्हे तर नेहमीसाठीच रामराम करायची सवय केली, तर साथरोग टाळण्याचा हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो. काही देशात एकदम जवळ घेऊन डोक्याला डोके लावून स्वागत करण्याची पद्धत आहे. त्यामुळे एकमेकांचे स्वास देखील अगदी जवळ येतात आणि जंतुसंसर्ग लगेच होतो. दुसऱ्या व्यक्तीच्या नाकातून बाहेर पडणाऱ्या श्वासातून ची हवा बाहेर येते.त्यापासून दम लागते, दम लागणे, सर्दी,खोकला इत्यादी लक्षणे होऊ शकतात.नाका तोंडावाटे जंतूचे संक्रमण झाल्यास शोषण मार्गाचे आजार होतात. खोकताना रुमाल ठेवावा.

येणारे शिंका थांबू नये. यावेळीही रुमालाचा वापर करावा,रुमाला च्या टोकाला कापुराचे वडी बांधून ठेवून त्याचा वास अधून मधून घ्यावा.रूमाल स्वच्छ धुऊन त्यावर इस्त्री फिरवून घ्यावे. त्यामुळे जंतुसंसर्ग दूर व्हायला मदत होते. आई मुलाला भरवताना आईला जंतुसंसर्ग झाला असेल तर कदाचित आईचे रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर तिला आजार होणार नाही, तर या उलट बाळाला संसर्ग होऊ शकतो. एकत्र भोजन टाळावे एकाच ग्लासातील पाणी दोघातिघांनी पिऊ नये. एकच क्लास शरबत दारूसाठी वापरू नये. एकमेकांचे कपडे उदाहरणार्थ रुमाल,टॉवेल, साडी वापरू नयेत,तसेच पेन्सिल, पेन, पाण्याची बाटली वापरतांना काळजी घ्यावी.

संसर्गजन्य आजार हे हवा पाणी जमीन व काल यात बिघाड झाल्यामुळे होतात त्यामुळे या चारही घटक सुव्यवस्थित राहतील या दृष्टीने करावयाचे उपयोजना प्रतिबंध होईल. हवेच्या शेतीसाठी दोघांचे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी होते औषधी द्रव्यांनी सिद्ध करून घेणे. जमिनी साठी परिसर स्वच्छ ठेवणे व कालानुरूप आहार-विहार करणे हे संसर्गजन्य आजार दूर करण्याची गुरुकिल्ली आहे प्रामुख्यानेआहार ऋतूनुसार घ्यावा सध्या वर्षा ऋतू चालू आहे या ऋतूत जन्म महाभूताचे अधिक्य असते. एकंदरीत आयुर्वेदाच्या दृष्टीने पचायला हलका असा आहार घ्यावा.

रोजच्या जेवणात गाईचे तूप व जेवणानंतर ताक घ्यावे, मुगाचे वरण घ्यावे, एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा सुंठ टाकून त्याचे केलेले भाकरी किंवा पोळी जेवणात घ्यावी .पुदिन्याची चटणी, ताकाची कडी असा आहार घ्यावा.पेय या द्रव्यांचा वापर अत्यल्प गरजेपुरता करावा. अनावश्यक वापर करू नये. पेय पदार्थ पावसाळ्यात दूध ताक दही लस्सी फळाचा रस कमीत कमी घ्यावा. लिंबू, शरबत फ्रिजमधील पाणी ,लोणी ,बटाटा, चीज पनीर इत्यादी पदार्थांचा वापर कमी करावा किंवा करूच नये तांदूळ भाजून घ्यावा भात शिजवताना किमान दोन-तीन वेळा पाणी टाकून द्यावे त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकून गरम करून त्या पाण्याच्या साह्याने गुळण्या कराव्यात. साधी पाण्याची वाफ घ्यावी. छातीला, चेहऱ्याला तेल लावून सोडून शिकावे. आयुर्वेदात यालाच स्नेहन स्वेदन म्हणतात.

सर्दी-पडशाचा आजारात याचा उपयोग होतो थोडा से भूक वाढवणारे पचन करणारे,पोट साफ करणारे तुळशीचा दोन चमचे रस आणि मध पडसे खोकल्यावर उत्तम औषध आहे. तुळशीची आठ-दहा पाने आणि मध एकत्र करुन चाटण घ्यावे.गुळवेल हे ग्रामीण भागात उपलब्ध असणारे वेल असून हे दीपक पाचक रक्तवर्धक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे.डायबिटीस असलेल्या लोकांना तर हे अधिक फायदेशीर आहे. गूळ वेलीचे कांड आणून त्यात बारीक बारीक तुकडे करुन त्याचा काढा घ्यावा. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते याला आयुर्वेदात रसायन म्हटले जाते. एकंदर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, व्यायाम, याचा अवलंब करून आज आपण संसर्गजन्य रोग निवारण दिनाच्या निमित्ताने काही प्रमाणात संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध करण्याचा संकल्प करूया.

Leave a Comment

x