लग्नानंतर आधारकार्ड वरील आडनावात बदल कसा करावा aadhar card change in name after marriage

लग्नानंतर आधारकार्ड वरील आडनावात बदल कसा करावा

देशातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड(Aadhar Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र किंवा दस्तऐवज(document) आहे.

लग्नानंतर आधारकार्ड वरील आडनावात बदल कसा करावा aadhar card change in name after marriage

देशामध्ये जवळपास 90 टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे.आता जन्मताच लहान मुलांना पण आधार कार्ड देण्यासाठी शासनाने तयारी केली आहे. आधार कार्ड अपडेट(update) ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

लग्नानंतर मुलींच्या आडनावात(surname) बदल होत असते आधार कार्ड मध्ये हा बदल करणे आवश्यक आहे तुम्ही जर आधार कार्ड मध्ये बदल न केलास तुमची माहिती चुकीची ठरू शकते आणि तुमचे कोणतेही महत्वाचे काम थांबू शकते. आधार कार्डचा(Aadhar Card) उपयोग हा शैक्षणिक तसेच बँकेमध्ये आणि आर्थिक व्यवहारासाठी आपण करत असतो. तुम्हाला जर आड नावामध्ये बदल करायचा असेल तर याची सुद्धा कायदेशीर प्रक्रिया आहे त्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आडनावात(surname) बदल करू शकता आडनावा मध्ये बदल करण्यासाठी एक साधी प्रक्रिया आहे.

लग्नानंतर आडनावात बदल करण्याची प्रक्रिया(process)

लग्नानंतर तुमच्या आडनाव बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल त्यानंतर त्याला राज्य सरकारने मान्यता दिली पाहिजे.यासाठी तुमच्याकडे लग्न प्रमाणपत्र(marriage certificate) असणे आवश्यक आहे. त्यासोबतच जुन्या आडनावाचे कागदपत्र(document) सुद्धा असणे आवश्यक आहे जर तुम्ही विवाह प्रमाणपत्र काढले नसेल तर राज्य सरकारच्या वेबसाईट वरून कोर्ट मॅरेज फॉर्म डाऊनलोड करा आणि तो भरून मॅरेज रजिस्ट्रारकडे जमा करा. त्यानंतर तुमचे विवाह प्रमाणपत्र(marriage certificate) तयार होईल यानंतर आडनाव बदलण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत नोटरी करावे लागेल. तुम्हाला नाव मध्ये काय बदल करायचा हे देखील सांगावे लागेल यानंतर साक्षीदारांसह तुमचे प्रतिज्ञापत्र केले जाईल.कोर्टात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तुम्ही तुमचे आडनाव बदलू शकता.

प्रतिज्ञापत्र व्यतिरिक्त तुमच्याकडे जुना आधार क्रमांक पतीचा आधार आणि इतर ओळख तसेच रहिवासी(domecile) संपूर्ण पुरावा असणे आवश्यक आहे हे सर्व आवश्यक कागदपत्रे जमा झाल्यानंतर जवळच्या कोणत्या आधार केंद्रावर घेऊन जा तेथे तुम्ही नाममात्र शुल्क देऊन तुमचे तपशील बदलले जातील अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नावांमध्ये म्हणजेच आधार कार्ड(Aadhar Card) मध्ये बदल करू शकता.

Leave a Comment

x