कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज मे महिन्याचा पगार इतक्या रुपयांनी वाढणार 7th pay commission

कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज मे महिन्याचा पगार इतक्या रुपयांनी वाढणार

केंद्र सरकारने(central government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची अच्छे दिन येणार असल्याचे बोलले जात आहे.

कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज मे महिन्याचा पगार इतक्या रुपयांनी वाढणार 7th pay commission

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात(7th pay commission) मे महिन्यात वाढ होणार आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. ह्याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा(government employee) महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

वाढीव महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. याआधी सुचने मध्ये 1 जानेवारी 2022 पासून केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता(DA) 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचा पगार वाढणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या सोबतच जानेवारी ते मार्च महिन्यातील थकबाकी कर्मचाऱ्यांना मे महिन्यातील देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या या घोषणेचा सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना म्हणजेच 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शन धारकांना फायदा होणार आहे. प्रत्यक्षात केंद्रीय कर्मचारी मूळ वेतन 18 हजार ते 56 हजार 900 रुपये इतके आहे महागाई भत्ता 34 टक्के असताना किमान मूळ पगाराचे गणना पाहिले तर केंद्रीय कर्मचारी किमान वेतन 18 हजार रुपये आहे हे 34 टक्के झाल्यानंतर तो 5580 रुपयांनी वाढून 6120 रुपये प्रति महिना होईल म्हणजेच दरमहा 540 रुपये पगार वाढणार आहे अशा स्थितीत मे महिन्यात मूळ वेतन अठरा हजार रुपये असलेल्या कर्मचार्‍यांच्या खात्यात 2160 रुपये वाढतील.

Leave a Comment

x