दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर SSC HSC Exam Timetable

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार याची प्रतीक्षा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना होती. त्या तारखा आज जाहीर झाले आहेत.

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर SSC HSC Exam Timetable

कोरोणामुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले आहेत. परंतु विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत दहावीची परीक्षा ही 15 मार्च 18 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

या वर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मध्ये संभ्रमाचे वातावरण होते.ओमीक्रोन च नवीन व्हेरियनट आल्यानंतर यंदा तरी परीक्षा होणार की नाही हा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाबत वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केले आहेत. त्यात बारावीची परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान पार पाडणार आहेत.तर त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे दहावीची परीक्षा 15 मार्च 18 एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. 14 एप्रिल ते 3 मार्च पर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.या वर्षी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी तयारी ला लागणे महत्वाचे आहे.

See also  गट ड संवर्गातील सरळसेवेने 3466 जागांची मेगा आरोग्य भरती Health Department Bharti2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x