कर्मचाऱ्यांना पीएफ कधी काढता येतो?जाणून घ्या.Provident Fund Withdrawal

कर्मचाऱ्यांना पीएफ कधी काढता येतो?जाणून घ्या.

सरकारी किंवा खाजगी कर्मचारी(employee) यांच्या वेतना मधून दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम कपात होते. ती रक्कम तुमच्या पीएफ(provident fund) खात्यांमध्ये जमा करण्यात येते. ही रक्कम तुमच्या हक्काची असते. अडचणीच्या काळात तुम्ही तुमची पीएफची रक्कम काढू शकता.

कर्मचाऱ्यांना पीएफ कधी काढता येतो?जाणून घ्या.Provident Fund Withdrawal

मात्र ही रक्कम काढताना शासनाने अनेक नियम लावलेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या पीएफ(provident fund) खात्यांमधील सर्व रक्कम काढायचे असेल तर त्याचे मुख्य अट म्हणजे तुम्ही दोन महिने बेरोजगार असणे आवश्यक आहे.तरच ती तुम्हाला काढता येते. पीएफ काढताना अनेक अटींची पूर्तता करावी लागते.जाणुन घेऊ या अटी.

लग्नासाठी किती रक्कम काढू शकता?

तुम्हाला जर तुमच्या किंवा तुमच्यावर अवलंबून असलेले एखाद्या व्यक्तीच्या लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर तुम्ही पीएफ खात्यामधून काही रक्कम काढू शकता. तुम्ही पीएफ खात्यांमध्ये जेवढी रक्कम जमा केली आहे. त्याच्या पन्नास टक्के रक्कम हे तुम्हाला लग्नासाठी मिळू शकते.मात्र त्यासाठी तुम्हाला कमीत कमी सात वर्षे तुमचा पीएफ कट होणे आवश्यक आहे. जर सात वर्षात तुमचा पीएफ कट होत असेल तरच तुम्ही लग्नासाठी खर्च करू शकता.

शिक्षणासाठी किती रक्कम काढता येते?

मुलांच्या शिक्षणासाठी तर खर्च होणारच. तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची गरज असेल तर तुम्ही पीएफ(provident fund) काढू शकता.मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही पीएफ मधुन जमा केलेल्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र यासाठी देखील सात वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरीमध्ये असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मुलांचा शिक्षणासाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकता.

घर खरेदी करण्यासाठी किती रक्कम काढू शकता?

घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपण जे नोकरीच्या काळामध्ये उरलेली रक्कम बाजूला काढून ते शिक्षणासाठी आणि घर घेण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी जमा करत असतो. जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल किंवा बांधकाम करायचे असेल तर तुम्ही पीएफ(provident fund) मधून पैसे काढू शकता घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुम्ही जमा केले रकममधील 50 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला पाच वर्षे नोकरी मध्ये असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे कर्मचारी लग्नासाठी शिक्षणासाठी आणि घर घेण्यासाठी आपल्या पीएफ खात्यामधून 50 टक्के रक्कम काढून काढू शकतो.

Leave a Comment

x