यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना Yashvantrao Chavan Mukt Vasahat Gharkul Yojana

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना

राज्यात ही योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. या योजनेचा लाभ मुख्यतः भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या कुटुंबांना देण्यात येतो. राज्यामध्ये भटक्या जमातीचे राहणीमान उंचावणे भटक्या जमातीचा विकास करणे, भटक्या जमाती जीवनात स्थिरता प्राप्त करणे,भटक्या जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट या योजनेचे आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना Yashvantrao Chavan Mukt Vasahat Gharkul Yojana

योजनेचे लाभार्थी
1 गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक या योजनेसाठी पात्र असतील.
2 विमुक्त आणि भटक्या जमातीचे लोक सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या अटी

1अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे
2 अर्जदार कडे स्वतःच्या मालकीचे घर नसावे
3 अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
4 अर्जदार कच्च्या घरात झोपड्यांमध्ये राहणारा असावा
5 लाभार्थी कुटुंबांना या आधीच कोणत्याही राज्यातील कोणतेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा
6 या योजनेचा लाभ पात्र कुटुंबात एकाच व्यक्तीला मिळेल
7 लाभार्थी कुटुंब भूमिहीन असावे लाभार्थी सहा महिने एकाच ठिकाणी वास्तव्यात असावा
8 यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे
फक्त ग्रामीण भागासाठी लागू आहे
9 दहा पात्र लाभार्थी कुटुंबासाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास लाभ देण्यात येईल
10 वीस कुटुंबासाठी एक हेक्टर जमीन उपलब्ध नसल्यास सदर अटी शिथिल करण्याचा अधिकार तालुकास्तरावरील समितीस आहे
11 वैयक्तिक लाभ घ्यावयाचा असेल तर रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत वैयक्तिक लाभ मिळेल

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेचा लाभ खालील लाभार्थ्यांना देण्यात येईल

गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे लोक अपंग, महिला, पूरग्रस्त क्षेत्र, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, विधवा,परितक्त्या यांना प्राधान्याने लाभ दिल्या जाईल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा अर्ज कुठे करावा?

या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र असलेल्या व अर्जदारांनी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे भेट द्यावी आवश्यक कागदपत्रांची आणि या योजनेला संबंधित अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाजकल्याण कार्यालय मध्ये अर्ज दाखल करावेत.

See also  महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना Enemployment Allowance Scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x