health tips for women’s in marathi,स्त्रियांचे आरोग्य, तपासण्या,जाणून घ्या स्त्रियांचे आरोग्य

स्त्रियांचे आरोग्य आणि तपासण्या

भारतामध्ये स्त्रियांमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या आहेत समाजाचा एक घटक म्हणून स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.स्त्रियांच्या आरोग्य विषयक तपासण्या नियमित केल्या तर स्त्रियांच्या आरोग्य सुधारन्यामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते. स्त्रियांचा आरोग्य म्हटला की त्यात विविध अंग येतात. पण आज मात्र आपण येथे काही वयानुसार स्त्रियांच्या समस्या त्यांचा विचार करणार आहोत सर्वप्रथम आपण किशोरवयीन मुलींचा विचार करूया या. काळामध्ये मुलींची शारीरिक वाढ मोठ्या झपाट्याने होते.त्यांची उंची वाढते.

याच कालखंडामध्ये मुली वयात येतात,जेव्हा का मुलीचे मासिक पाळी सुरू होते तेव्हा आपण ते वयात आली असे म्हणतो.  मुलगी 14 वर्षाची झाल्यानंतर देखील तिच्यामध्ये बदल दिसून आले नाही किंवा ती सोळा वर्षांची झाल्यानंतर देखील मासिक पाडी सुरू झाली नाही तर मात्र वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सोनोग्राफी ची गरज भासली तर दुर्बिणीतून तपासनी, रक्ताच्या काही तपासण्या अशा वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागू शकतात.या काळात काही मुलींचा झपाट्याने वजन वाढणे कडे कल दिसून येतो. यासाठी मुलींच्या शरीराच्या आकारमानानुसार लक्ष ठेवणे गरजेचे असते त्याकरता मुलींची उंची मोजण्याचे आणि वजन तपासणी महत्त्वाची असते. त्यावरून हलली वैद्यकीय क्षेत्रात शारीरिक वस्तुमान निर्देशांक ज्याला इंग्रजीत बॉडी मास इंडेक्स किंवा बी एम आय असे म्हणतात. तो मजला जातो खरा तर हा निर्देशांक प्रत्येकाला स्वतः घरच्या घरी देखील मोजता येतो.

किलोग्राम मधील वजनाला मीटर मधील उंचीच्या वर्गांनी भागला की हा निर्देशांक का येतो. सर्वसामान्य निरोगी मुलीचा हा निर्देशांक साडेअठरा ते 24.9दशांश त्यांच्यामध्ये असा असायला हवा जर तो साडेअठरा पेक्षा कमी असेल तर ते मुलगी कुपोषित आहे असे समजले जाते ज्या मुलीचा बीएमआय 25 ते 29 दरम्यान असतो ती स्थूल असते.30 आणि त्यापेक्षाही जास्त असेल तर मात्र अशा मुलींना लठ्ठ म्हणावे लागते लठ्ठपणा मध्ये या आजारात त्याच्या पोट त्यांच्या पोटावरची चरबी वाढत जाते. पोटाचा घेर जास्त प्रमाणात वाढतो.

मासिक पाळी अनियमित होते किंवा काही महीने लांबते देखील त्यांची सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना दोन्ही बीजांडकोशात अनेक फोड दिसून येतात लग्नानंतर गर्भधारणा होण्यात विलंब वरच्यावर गर्भपात या दोषांच्या पुढच्या पायऱ्या आहेत लठ्ठपणा एकंदरीतच पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने घातक असतो. त्यामुळे रक्तदाब मधुमेह हृदयविकार यासारख्या अकाली वयात होऊ शकतात. त्यासाठी सगळ्या स्त्रियांनी आपला बीएमआय आणि पोटाचा घेर प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे.

थोडक्यात मुलींनी किंभुना सगळ्या स्त्रियांनी आपला बीएमआय आटोक्यात आणि योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी डोळसपणे काळजी घेतली पाहिजे. ह्यासाठी फार काही करावे लागत नाही सुयोग्य आहार आणि नियमित व्यायाम या साध्या सवयीने ते साध्य होते. पाळी मध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव कुपोषित जत अशा अनेक कारणांमुळे मुलींना रक्तक्षय होऊ शकतो. मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमीत कमी 12 ग्रॅम इतका तरी असायला जावा. हेमोगलोबिन जर कमी असेल तर मुलींना थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे हात पाय दुखणे, काही करावेसे न वाटणे असे त्रास सुरू होतात त्यासाठी प्रत्येक स्त्रीने किंवा मुलीने हिमोग्लोबिनची तपासणी करायला पाहिजे.

योग्य आहार आणि फॉलिक आसिड आठवड्यातून एक गोळी रक्तक्षयाचे शक्यता कमी करतात. मासिक पाळी मध्ये असणाऱ्या रक्तामध्ये लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. नियमितपणे अशा गोळ्या घेऊन रक्ताशय ताडता येतो 20 ते 40 मध्ये स्त्रियांच्या आयुष्यातला कुटुंबाची जबाबदारी अध्याय सुरु होतो.या वयोगटात वैवाहिक जीवनाची सुरुवात होते. गर्भधारणा, प्रसूती, बाळाचे संगोपन या जबाबदाऱ्या निभावताना आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

काही स्त्रियांना या काळात मासिक पाळी तक्रारी सुरुवात होतात अ नियमित पाळी च्या दिवसात कंबर दुखी पोट दुखी असल्या तक्रारी जाणवणे तसेच त्या अंगावर काढायचे बऱ्याच स्त्रियांना प्रवृत्ती असते.यासाठी त्यांनी वेळीच वैद्यकीय सल्ला आणि योग्य उपचार घेतले तर त्रासापासून नक्कीच मुक्ती मिळवता येते. सोनोग्राफी पोटाची आणि जननेंद्रिय याची तपासणी करून गर्भाशयात गाठ किंवा इतर काही आजार असतील तर त्याचे निदान करता येतात.

दुर्बिणीतून ओटीपोटातील तपासणी दारे या अवयवांची तपासणी होते. बीजांडकोश वरचे फोड, गाठी जंतुसंसर्गामुळे तंतुजाल होऊन एकमेकांना चिकटलेलेअवयव अशा व्याधींचे निदान यातून करता येते. कुशल डॉक्टर त्याचवेळी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून या व्याधीवर उपचार करतात. गर्भधारणा राहण्यासाठी अडचणी ह्या वयातील काही स्त्रियांची एक महत्त्वाची समस्या आहे.अशा स्त्रियांच्या काही विशेष तपासण्या कराव्या लागतात.

दुर्बिणीतून तपासणीने गर्भनाळ मोकळ्या आहेत ना त्यांच्यात काही ब्लॉक तर नाही झाले ना हे जसं समजत तसेच ओटीपोटातील इतर काही आजार असला तर त्यांच्या देखील निदान होतं गर्भाशयात औषध भरून संप्रेरकाच्या तपासणी सोनोग्राफी यामुळे स्त्रियांचे बीज निर्मिती व्यवस्थित होते आहे किंवा नाही हे समजत. याच वयोगटात बऱ्याच स्त्रियांना योनिमार्ग स्त्राव जाण्याची समस्या होते नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात हिरवट पिवळ्या रंगाच्या दुर्गंधी व्यक्त योनिस्त्रव विविध प्रकारच्या जंतुसंसर्गामुळे होतो.

लघवीला जळजळ होऊन वरचेवर लघवीला जावा लागते. यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य उपचार करून घ्यावेत अशा प्रकारच्या तपासण्या विविध आजारांना दूर ठेवतील हे आपल्या आयुष्यात धोक्यापासून वाचू शकते. चाळीस नंतर स्त्रियांना काही त्रास होऊ लागला की प्रथम आपल्याला कर्करोग किंवा कॅन्सर असेल असे शंका त मनात डोकावते वास्तविक कर्करोग फक्त चाळीसीनंतर च होतो असे काही नाही कोणत्या वयात कर्करोग होऊ शकतो

हे जितकं खरं आहे तितकच चाळीस नन्तर इतर आजार उद्भवू शकतात याचे भान असायला हवे हे इतर वयोगटापेक्षा 40 नंतर कर्करोग होण्याचा संभव अधिक असतो हे तितकेच सत्य आहे गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोगाच म्हणजेच सरव्याकल कॅन्सर च तो होण्या पूर्वीच्या अवस्थेत असताना देखील निदान करता येत मग आवश्यकतेनुसार त्यावर उपचार करून कर्करोगाचा धोका टाळता येतो. त्यामुळे या गटातील स्त्रियांनी आपली तपासणी नियमितपणे करून घेण्याचा श्रेयस्कर ठरते. त्यासाठी प्रथम योनी मार्गातून गर्भाशयाच्या तोंडाची तपासणी केले जाते त्यानंतर त्याला ऑसिडक आसिड लावून तपासणी केले जाते.

शिवाय त्यापासून काही पेशीनचा नमुना घेऊन त्याची पयप स्मियर तपासणी केली जाते यात काही संशयास्पद आढळून आले तर त्याचे कॅल्पोस्कोप नावाच्या योनिमार्ग वापरणाऱ्या दुर्बिणीतून तपासणी केली जाते. आणि अशा संशयास्पद ठिकाणांची बायोपसी म्हणजे तिथला तुकडा तपासणीसाठी घेतला जातो त्याच्या प्रयोगशाळेतील तपासनी ने आम्हाला कर्करोग पूर्व अवस्था आहे किंवा नाही हे समजू शकते. कर्करोग पूर्वा अवस्थेचे निदान झालं तरी लगेच गर्भाशय काढण्याची आवश्यकता नसते. संशयास्पद जागेचा गोलाकार किंवा शंकूच्या आकाराचा भाग काढून टाक ना इतपतच मर्यादित असे याचे सुलभ आणि सोप्या उपचार असतात.

अर्थात त्यानंतर नियमितपणे फॉलोअप चालू ठेवण मात्र आवश्यक असतं. योनीतून स्त्राव अधूनमधून रक्तस्राव या कर्करोगाचे लक्षणे जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कर्करोगाचा संशय आलेला गर्भाशयाच्या तोंडावर जागेचे बायोप्सी करून त्याचे निदान करता येते.या वयात नियमितपणे सोनोग्राफी जे तपासण्या करून गर्भाशयाच्या अंतरावरणावर लक्ष ठेवणे देखील श्रेयस्कर असते.

गर्भाशयचे हे आवरण जर प्रमाणाबाहेर जाड होऊ लागल तर कर्करोगाचा धोका ओळखून त्याच्या बायोप्सी ची तपासणी करून त्याच्या निदान करता येतं.प्रौढ स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव जाऊ लागला तर गर्भाशयाला कर्करोग नाही ना पाहण्यासाठी अशी तपासणी करावी लागते. या कर्क रोगाच्या उपचारासाठी गर्भाशय काढावे लागत. पोटाचा आकार वाढतो आहे असं वाटलं हाताने चा चप्ल्यानंतर गाठ लागत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा गाठ गर्भाशयावर आहे का हे सोनोग्राफी तून समजत आणि ती गाठ साधी आहे का की कर्करोगाची आहे

हे पाहून पुढचे उपचार करता येतात तसेच स्तनांचा कर्करोग देखिला ते अतिशय सुरुवातीच्या काळात ओळखता येतो यासाठी वेळोवेळी या वैद्यकीय तपासणी करून घ्यावी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्तनांची मॅमोग्राफी हे एक्स-रे ची विशेष तपासणी केली तरच स्तनांच्या कर्करोगाचे अगदी सुरुवातीपासूनच या अवस्थेतच निदान करता येतं.मग त्यावर लगेच उपचार करून या कर्करोगाचे समूळ उच्चाटन करता येते.

मात्र एकदा हा कर्करोग वाढायला लागला की तो आजूबाजूच्या पसरायला लागतो. की मग मात्र या कर्करोगावरील उपचारांच्या यावर मर्यादा येतात या वयोगटातील स्त्रियांनी आज त्या कर्करोगाचा व इतर आजाराचा वेळेत निदान व्हावा म्हणून काहीही त्रास होत असेल तरीदेखील निदान वर्षातून एकदा तरी आपले आरोग्य तपासणी करून घेणे येत असतात यात रक्ताचा पोटाचा घेर, वजन,शारीरिक तपासणी जनन मार्गाचे तपासणी सोनोग्राफी या महत्त्वाच्या तपासण्या करून घ्याव्यात बायोप्सी केवळ आवश्यकता भासली तरच करायची असते या सगळ्या तपासण्यांमधून कोणताही आजार नाही असे निष्पन्न झाले तर केलेला खर्च वाया गेला असे समजण्याचे काही कारण नाही आपण निरोगी आणि सुदृढ आहोत हीच बातमी सर्वश्रेष्ठ बातमी नाही का निरोगी शरीर आणि सुशांत मन स्वस्थ ही तर आपली खरी संपत्ती आहे यासाठी दक्ष राहून आपणच आपली काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

x