जागतिक महिला दिन, women’s day

जागतिक महिला दिन

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च महिला दिवस 1943 साली साजरा झाला. पुढे 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2021 ची थीम आहे women’s in leadership: Achieving an equal future in a COVID-19 world.र्भारतीय परंपरेचा थोडा अभ्यास केला तर जागतिक महिला दिनाचे महत्त्व अधिक कडून येईल आणि हा दिवस साजरा केल्याचे सार्थक होईल.आजच्या दिवशीच नव्हे तर दररोज,नियमित आपल्या परिचयातील सर्व स्त्रियांना मानाने वागविणे,आदर,नमस्कार करणे, त्यांना आनंद होईल अशा तऱ्हेने वागणे, त्यांना प्रिय असेल ते देणे, आवडीनिवडींनुसार भेटवस्तू देणे, एकंदरीत स्त्रीला मान सन्मान देणे, खऱ्या अर्थाने मनापासुन स्त्रीचा अधिकार स्वीकारला, तिचे महत्त्व ओळखले तर आज जागतिक महिला दिनाचे खरे सार्थक होईल.
जागतिक महिला दिन महिलांना सन्मान देण्यासाठी, महिला स-शक्तिकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.जांभळा हिरवा आणि पांढरा रंग आंतराष्ट्रीय महिला दिनाचे प्रतीक म्हणूनही वापरले जातात.जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे,म्हणजेच जगाच्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे.मात्र असा एखादा दिवस नेमून देऊन तिच्या क्षमतांवर विचार केला आणि तिला संधी दिली तर ती महिला काय करू शकते हे लक्षात येते. महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध करून दिले आहे. महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभीर्य जास्त असते. मुलगी ही उद्याची माता असते. म्हणून तिला तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे हे विसरू नकोस असे सांगितले जाते.आपल्याला पुढे चालून कुटुंब व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे असी जाणीव स्त्रीला असते.अलीकडच्या काळात महिलांचे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढून दहावी आणि बारावी सारख्या मोक्‍याच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात,तेव्हा तर मुलींचे पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्तच आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रगती करून आपली मान उंचावली आहे.महिला दिनानिमित्त मुलगा- मुलगी समानता मानून त्याप्रमाणे महिलांचा आदर, त्याना मान देऊन खर्‍या अर्थाने महिलादिन साजरा करूया

Leave a Comment

x