झटपट पोटाची चरबी कमी करायची तर मग हा आहार घ्या weight loss tips

झटपट पोटाची चरबी कमी करायची तर मग हा आहार घ्या.

Weight loss tips वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. आहारात बदल केला तर वजन कमी होण्यास मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आहारातील कर्बोदकांमधे कॅलरीचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होण्यास सुरुवात होते. वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कार्बयुक्त पदार्थ समाविष्ट करा. अन्नात प्रोटीनचे प्रमाण जास्त असले पाहिजे आणि कॅलरीचे प्रमाण खूप कमी असावे असे केल्याने आपले वाढलेले वजन झटपट कमी होते.

झटपट पोटाची चरबी कमी करायची तर मग हा आहार घ्या weight loss tips

1) आपल्या सर्वांना माहीत आहे की जंक फूड खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी खूप जास्त असतात. मैद्यापासून बनवलेले पिज्जा, बर्गर,बटाटा चिप्स,पास्ता,कुकीज हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

2)पोटाची चरबी कमी करण्यासाठी जास्त प्रथिने युक्त अन्न यांचा समावेश करा. प्रथिनयुक्त अन्न खाल्ल्याने आपल्या पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. प्रथिनयुक्त आहार घेतल्याने स्नायू बळकट होतात.

3) पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण आहारात सोयाबीन,मूग,मसूर,अंडी इत्यादीचा समावेश करा.

4) वजन कमी करण्यासाठी आहारात साखरेचा वापर कमी करा. आहारात हरबल टी,ग्रीन टी समावेश करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5)प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते यामध्ये कॅलरी जास्त असतात त्यामुळे असे पदार्थ टाळावे.

6)तुम्हाला वजन पोटाची चरबी कमी करायचे असेल तर तळलेले पदार्थ खाऊच नका. बटाटा वडा,भजे,समोसा तुपात बनवलेले पदार्थ खाल्ल्यास वजन वेगाने वाढते.

Leave a Comment

x