मतदार ओळखपत्र आधार कार्ड शी लिंक होणार Voter ID link with Aadhar Card

मतदार ओळखपत्र आधार कार्ड शी लिंक होणार

केंद्र सरकारने निवडणूक मतदार नोंदणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.आता पर्यंत आधार कार्ड हे पॅन कार्ड शी लिंक आहे परंतु आता मतदार कार्ड हे आधार शी लिंक होणार.

मतदार ओळखपत्र आधार कार्ड शी लिंक होणार Voter ID link with Aadhar Card

केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने तीन मोठे बदल केले आहेत यामध्ये मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद आहे.परंतु तूर्तास आधार क्रमांक मतदान कार्ड (Voter ID) शी लिंक करणे हे ऐच्छिक असणार आहे. त्या सोबत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळा संधी देण्यात येणार आहे.बऱ्याच व्यक्तींकडे आधार कार्ड आहे तर मतदान कार्ड नाही लोकांचे मतदान कार्ड सुद्धा काढलेले नाहीत.

नवीन मतदान नोंदणी साठी असलेल्या 1 जानेवारी जन्मतारीख यामुळे अनेक युवकांना मतदान नोंदणी साठी अडचणी येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. एक जानेवारी ही तारीख असल्याने दोन जानेवारी व त्यानंतर वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदान नोंदणी करता येत नव्हती. Voter ID link with Aadhar Card त्यांना थेट पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागत होती. कायदा आणि न्याय मंत्रालयाने संसदेत सांगितले की लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 14b मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरून दरवर्षी मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी 1 एप्रिल 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.त्यामुळे नवीन मतदारांना नोंदणीसाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार नाही. एकाच व्यक्तीची दुबार मतदार नोंदणी करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आधार क्रमांकाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी होण्यास आळा घालता येईल. त्यासोबतच सुरक्षा दलात काम करणाऱ्या महिलांच्या पत्नीने पोस्टल बॅलेट द्वारे मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे.सध्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही सैनिक पत्नीला सैन्य मतदार म्हणून नोंदणी करता येऊ शकेल मात्र महिला सुरक्षा दलाच्या पतीला हा अधिकार नाही मात्र प्रस्तावित विधेयकानंतर संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली जाणार आहे ह्या कायद्यात पत्नी हा शब्द वगडून त्या ठिकाणी spouse म्हणजे पती/ पत्नी या शब्दाचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

See also  12 वी नंतरची प्रवेश प्रकिया आजपासून सुरू Admissions after 12 th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x