व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता घरी राहूनच कशी दूर कराल Vitamin- D

व्हिटॅमिन डी ची कमतरता घरात राहूनच कशी दूर कराल

Vitamin -D कोरोनाव्हायरस पासून बचाव करण्यासाठी अनेक लोक घरात बसूनच आहेत.अशावेळी व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणू शकते.व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.हाडे आणि स्नायू मजबूत राहावे यासाठी विटामिन डी महत्त्वाची भूमिका बजावत असते. हाडे दुखी,स्नायूंमध्ये वेदना,अशक्तपणा जाणवत असेल तर व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. जर आपल्याला सतत थकल्यासारखे आणि सुस्तपणा जाणवत असेल तर शरीरातील व्हिटॅमिन डी ची पातळी तपासा. आपल्याला माहीतच आहे की, सकाळचे कोवळे सूर्यप्रकाश द्वारे विटामिन डी ची कमतरता आपण दूर करू शकतो.ह्याव्यतिरिक्त आहारातील काही असे पदार्थ आहे जे आपली विटामिन डी ची पातळी व्यवस्थित ठेवू शकतात. या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करा.

व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता घरी राहूनच कशी पूर्ण कराल Vitamin- D

1) अंडे हे विटामिन डी चे उत्तम स्त्रोत आहे. अंड्याच्या पिवळ्या भागाचे सेवन केल्याने ही कमतरता दूर होऊ शकते.

2) संत्र्याचा रस विटामिन सी सोबत विटामिन डी ची कमतरता भरून काढते दररोज सेवन करून समस्या सोडवू शकता.

3) गाईचे दूध विटामिन डी चा चांगला स्त्रोत आहे. तसेच दहीचे सेवन केल्याने विटामिन डी ची कमतरता दूर होते. आपण याचे नियमित सेवन करू शकता.

4) आपण जर मांसाहारी असाल तर मासे आहारात सेवन करू शकता. Vitamin-D हिरव्या पालेभाज्या तसेच केशरी रंगाची फळे यांचे सेवन करू शकता.

5) शाकाहारात उपलब्ध असलेला विटामिन डी चा स्त्रोत म्हणजे मशरूम या पदार्थाचा आहारात समावेश केल्यास कमतरता भरून निघेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

x