विदर्भातील अष्टविनायक दर्शन Vidarbh Ashtavinayak Darshan

विदर्भातील अष्टविनायक मंदिरे

पश्चिम महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिराप्रमाणेच विदर्भात सुद्धा अष्टविनायक मंदिरे आहेत. त्यामुळे त्यांना विदर्भातील अष्टविनायक मंदिरे असे सुद्धा संबोधण्यात येते. गणपती म्हणजे महाराष्ट्रातील आराध्य दैवत. 10 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. मोठ्या प्रमाणात भाविक अष्टविनायक दर्शन घेतात . प्रत्येक कामाची सुरुवात आपण श्री गणेशाय नमः या उच्चार ने करतो यागणेशोत्सवा निमित्त विदर्भातील अष्टविनायक मंदिर यांची आपणास ओळख व्हावी ह्या उद्देशाने सदर माहिती.

विदर्भातील अष्टविनायक दर्शन Vidarbh Ashtavinayak Darshan

1) टेकडी गणपती मंदिर- टेकडी गणपती मंदिर हे नागपूर शहरामध्ये असून नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर आहे. नागपूर शहरातील लोकप्रिय मंदिर म्हणून या मंदिराची गणना केली जाते. हे मंदिर एका टेकडीवर निसर्ग रम्य ठिकाणी असल्यामुळे याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते.

2)अष्ट दशभुजा मंदिर- नागपूर जिल्ह्यातील रामटेक या शहरात तलीपुर्यात हे एक मंदिर आहे हे गाव नागपूर हुन सुमारे 46 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीला अठरा हात आहे.

3) वरद विनायक गणपति मंदिर- चंद्रपूर जिल्ह्यातील गवराला येथे एक प्राचीन मंदिर आहे हे गणपती मंदिर टेकडीवर वसलेले असून गणपतीची भव्य अशी मूर्ती आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे आहे.

4) चिंतामणी मंदिर –विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ शहरापासून 23 किमी अंतरावर असलेल्या कळंब या गावात आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारापासून पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर समोर एक कुंड दिसते या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. त्यातून सुमारे दर बारा वर्षांनी या पानी वर येते.

5) सिद्धिविनायक मंदिर –हे मंदिर वर्धा जिल्ह्यातील केळझर या गावी आहे सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती हे चार फूट उंचीची आहे या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे सुध्दा म्हणतात.

6) सर्वतोभद्र गणपती- सर्वतोभद्रा गणपती हा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे आहे हा गणपती वैशिष्ट्यपूर्ण असून विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक समजला जातो.

7) भृशुंड गणपती मंदिर –हे गणपती मंदिर भंडारा जिल्ह्यातील मेंढा या गावात वसलेले आहे हे गाव भंडारा पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून लाल रंगाच्या दगडात कोरलेली ही मूषकरुढ प्रतिमा आहे.

8) श्री विघ्नेश गणेशाचे मंदिर- विदर्भातील अष्टविनायक हे एक स्थान प्रथम क्रमांकावर आहे. आदसा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे हे गाव तेथील गणेश मंदिरामुळे नावाजलेले आहे गणेश मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्ती ला शमी विघ्नेश म्हणतात महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेश मूर्ती आहे हे जवळपास सहा मीटर उंच आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे.

Leave a Comment

x