ऑनलाइन घोटाळ्यापासून आधार कार्ड चा असा करा सावधगिरी ने वापर use Aadhar card with extreme caution

ऑनलाइन घोटाळ्यापासून आधार कार्डचा असा करा सावधगिरीने वापर

ऑनलाइन घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. केव्हाही कुठेही तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. UIDAI ने अलीकडेच ऑनलाइन घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा दिला आहे.

ऑनलाइन घोटाळ्यापासून आधार कार्ड चा असा करा सावधगिरी ने वापर use Aadhar card with extreme caution

घोटाळेखोर ओटीपी आणि बनावट लिंक च्या आधारे लोकांची फसवणूक करू शकतात. आधार कार्डशी आपली सर्व माहिती संलग्न केलेली असते. याचा गैरलाभ घोटाळेखोर घेऊ शकतात.UIDAI ने एका ट्विट द्वारे स्पष्ट केले आहे की,आधार कार्डचा नंबर 12 अंकी असतो हा नंबर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून व्हेरिफाय केला जाऊ शकतो. आधार कार्डचा ओळखीचा पुरावा म्हणून उपयोग करण्यापूर्वी ते व्हेरिफाय करणे अत्यंत गरजेचे आहे.

आधार कार्ड घोटाळ्यामुळे स्वतःचा असा करा बचाव

1) अनेक कामांसाठी आपण आधार कार्ड चा उपयोग करतो.तुम्ही जर कुठल्या सार्वजनिक संगणकावर आधार कार्ड डाऊनलोड केले असेल तर ते काम झाल्यानंतर लगेच डिलीट करा.

2) कोणतेही ऑनलाईन काम करत असताना वन टाइम पासवर्ड( ओटीपी ) आपल्या मोबाईल वर येतो पण कोणत्याही परिस्थितीत ओटीपी इतरांना सांगू नका.

3)तुमचा मोबाईल नंबर दुसऱ्याच्या आधार कार्डचे संलग्न करण्यास परवानगी देऊ नका तसेच तुमच्या आधार कार्ड शी दुसऱ्याचा नंबर लिंक करू नका.

4) नेहमी आधार कार्ड च्या व्हर्चुअल आयडी चा वापर करा.यात सोळा अंकी आधार कार्ड मिळेल ज्याचा वापर आधार कार्ड च्या बदल्यात करता येईल.

5)UIADAI पोर्टल वरून नेहमीच आपल्या बायोमेट्रिक ला लॉक ठेवा आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर च्या साह्याने अनलॉक करण्याची व्यवस्था ठेवा.

Leave a Comment

x