24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2021 World Tuberculosis Day

24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2021 World Tuberculosis Day

क्षयरोग दिन हा संपूर्ण जगात (WHO) अंतर्गत साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जागतिक क्षयरोग दिनाची थीम आहे, The Clock is Ticking. जागतिक आरोग्य संघटना ने 2030 पर्यन्त क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवले आहे. सर्वप्रथम रॉबर्ट कोच यांनी क्षयाचे जन्तु शोधून काढले.

World Tuberculosis Day क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबर्क्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे.तो मुख्यत्वे फुप्फुसाचा आजार आहे.शरीराच्या इतर अवयवांना सुद्धा क्षयरोग होऊ शकतो. उदाहरणार्थ मज्जासंस्था,रक्ताभिसरण संस्था,त्वचा, हाडे इत्यादी क्षयरोगाचे जिवाणू श्वासावाटे फुफ्फुसात प्रवेश करतात तेथे त्यांची संख्या वाढते,नंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीला क्षयरोगाची लक्षणे दिसायला लागतात. याला आपण फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणतो.ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा माणसांना क्षयरोगाची लक्षणे दिसू लागतात एक क्षयरोगी वर्षभरात 10 ते 15 माणसांना आजार पसरू शकतो. हा प्रसार थांबविण्यासाठी क्षय रोग्याला लवकरात लवकर उपचारा खाली आणणे हा एक उपाय आहे. जोपर्यंत रुग्णाला उपचार मिळत नाही तोपर्यंत तो रुग्ण सांसर्गिक असतो. उपचार सुरु केल्यानंतर तो रुग्ण थोड्याच अवधीत असांसर्गिक होतो.

24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2021World Tuberculosis Day

क्षय रोगाची लक्षणे

1) दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला.
2) खोकताना थुंकी वाटे रक्त पडणे
3) सायंकाळी वाढत जाणारा ताप
4 भूक कमी लागणे, वजन कमी होणे

क्षयरोगाचे निदान

संशयित दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असेल तर व्यक्तीची थुंकी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून या आजाराचे निदान करता येते. तसेच क्ष-किरण तपासणी, कल्चर तपासणी व इतर तपासण्या. थुंकी तपासणी हे सर्वत्र उपलब्ध असणारे खात्रीची व सर्वत्र वापरात येणारी पद्धत आहे.

उपचार

क्षयरोगाचा उपचार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत मुलांना व प्रौढ व्यक्तींना रुग्णनिहाय औषधे कॅटेगरी आणि वजनानुसार उपलब्ध आहेत. डॉट्स उपचार पद्धतीने क्षय रुग्ण पूर्णपणे बरा होतो वैद्यकीय सल्ल्यानुसार कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रतिबंधक उपाययोजना म्हणजे बीसीजी लसीकरण संशयित रुग्णांचे लवकरात लवकर निदान,रुग्णाला पूर्ण उपचार देणे.

Leave a Comment

x