हवेद्वारे पसरणारे आजार व प्रतिबंधत्म उपाय TB sorsdiphtheria whopping cough measles chikanpox leprosy

हवेद्वारे पसरणारे रोग

क्षयरोग
क्षयरोग हा मायक्रोबॅकटिरियम ट्यूबर्क्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. तो मुख्यत्वेकरून फुप्फुसाचा आजार आहे. शरीराच्या इतर अवयव नाही तो होऊ शकतो. उदाहरणार्थ मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, त्वचा, हाडे इत्यादी क्षयरोगाचा रुग्ण हा खोकतो शिंकतो त्यावेळी क्षयरोगाचे जंतू वातावरणात पसरतात. श्वास घेत असताना ते निरोगी मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर सर्वच माणसांना क्षयरोग होईल असे सांगता येत नाही. ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी अशा माणसांना क्षयरोगाची लक्षणे दिसतात. आजार होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत उदाहरणार्थ दाटीवाटीने राहणारी माणसे, बंद खोल्या, कुपोषण, रोगप्रतिकारकशक्ती कमी असणे आणि इतर काही मोठे आजार.क्षयरोगाचा प्रसार थांबविण्यासाठी क्षय रुग्णाला लवकरात लवकर उपचारा खाली आणणे हाच एक उपाय आहे. ज्यावेळी क्षयरोगाचा जिवाणू श्वासावाटे आत प्रवेश करतो तेथे त्यांची संख्या वाढते नंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीला क्षयरोगाची लक्षणे दिसायला लागतात याला आपण फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणतो. जोपर्यंत रुग्णाला उपचार मिळत नाही तोपर्यंत तो रुग्ण सांसर्गिक असतो उपचार सुरू केल्यानंतर काही कालावधीमध्ये तो व्यक्ती असांसर्गिक होतो. क्षयरोग हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो जास्तकरून पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.क्षयरोग हा अनुवंशिक आजार नसून कुपोषित व्यक्तीमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तीला क्षयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. जीवाणू चा नैसर्गिक संसर्ग झाल्याने व्यक्तीमध्ये या आजारा विरोधी प्रतिकारक शक्ती निर्माण होते.बीसीजी लस दिल्याने देखील प्रतिकारशक्ती निर्माण होते. क्षयरोगाचा अधिशयन काळ हा काही आठवडे काही महिने ते काही वर्षांपर्यंत असू शकतो. क्षयरोगाची काही सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात जसे एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,थुंकी वाटे रक्त पडणे, भूक कमी लागणे, तसेच क्षयरोगाची इतर काही लक्षणे शरीराच्या ज्या भागाचा क्षय रोग असेल त्याप्रमाणे वेगवेगळे असू शकतात.सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करून आजाराचे निदान करून घ्यावे. थुंकीची तपासणी ही सोपी सरळ स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे व खात्रीचे अशी क्षयरोगाची तपासणी पद्धती आहे. क्षयरोगाचा उपचार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुलांना व प्रौढ व्यक्तींना रुग्णांना औषधे विशिष्ट रुग्णांना पॅक मध्ये उपलब्ध आहेत क्षयरोगाचा उपचार हा वेगवेगळ्या कॅटेगिरीत उपलब्ध आहे.क्षयरोगावर प्रतिबंध प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजी लसीकरण करणे आवश्यक असते संशयित रुग्णाचे लवकरात लवकर निदान करणे रुग्णाला पूर्ण उपचार देणे.

सार्स

सार्स करोणा नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचे रुग्ण सुरवातीला सन 2003 साले चीनमध्ये आढळला. त्यानंतर सिंगापूर वियतनाम तैवान हॉंगकॉंग या भागात आजाराचा वेग वाढला ह्या आजारांमध्ये प्रामुख्याने लक्षणे आढळतात ती म्हणजे ताप व थंडी थकवा, डोकेदुखी, खोकला घसा दुखी, सर्दी, चक्कर येणे, अनेक वेळा सारख्या गंभीर रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवासाची आवश्यकता भासते. रुग्णाच्या निकट सहवासात आलेल्या व्यक्तींना या आजाराचा श्वसनावाटे उडणाऱ्या थेंबामध्ये हा विषाणू आढळत असला तरी असे पुरेशी सिद्ध झालेले नाही हॉंगकॉंग या शहरांमध्ये सांडपाणी विष्ठा आणि झुरळे यांना संशयित मानण्यात आले होते या सारख्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे रुग्णाचे योग्य वेळी निदान.

घटसर्प

घटसर्प हा कॉर्नी बॅक्टेरियम डीपथेरिया नावाच्या जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग असून त्यामुळे घसा टॉन्सिल्स यांचा संसर्ग होऊन त्यावर तयार झालेल्या पडद्यामुळे स्वास अडथळा तसेच मृत्यू होऊ शकतो या आजाराची प्रमुख लक्षणे घसा खवखवणे सैम्य ताप घशामध्ये त्रास घटा सर्पाचा जिवाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या तोंड नाक घसा या भागात वास्तव्य करतो खोकला आणि शिंकेच्या माध्यमातून तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. प्रतिबंधात्मक उपाय योजना बालपणाच्या सुरुवातीच्या काळात डीपीटी म्हणजे घटसर्प डांग्या खोकला व धनुर्वात यांचे एकत्रित म्हणजेच लसीकरण करणे महत्त्वाचे ठरते. लसीकरण अभावी 14 वर्षापर्यंतची बालके घटसर्प रोगाच्या जंतुसंसर्ग याला वारंवार संवेदनशील आहेत लसीकरण कार्यक्रमानुसार किंवा वेळापत्रकानुसार डीपी टीचेलसीकरण देण्यात यावे.
डांग्या खोकला

डांग्या खोकला म्हणून ओळखला जाणारा स्वशन मार्गाचा आजार हा सांसर्गिक असून तो जिवाणूमुळे होतो या रुग्णांमध्ये वारंवार खोकला येतो यामध्ये खोकला म्हणजे दोन किंवा अधिक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला. खोकल्याची तीव्रता जास्त डांग्या खोकला जीवाणू रुग्णाच्या नाकातोंडात राहतात आणि खोकल्यातून किंवा शिंके याद्वारे हवेतून सहजपणे पसरतात लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार दिलेले डीपीटी लसीकरण डांग्या खोकल्याचा प्रतिबंध करते.

गोवर
गोवर हा विषाणूमुळे होणारा हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून त्याचे जंतू बाधित व्यक्तीच्या नाकातोंडात तसेच घशात आढळतात. जंतू संसर्ग झालेल्या व्यक्तीस ताप खोकला व अंगावरील पसरत चाललेले लाल पुरळ यामुळे अतिसार, निमोनिया याची बाधा होऊन मृत्यू होऊ शकतो. या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप व अंगावरील पुरळ सर्दी-खोकला आणि लालसर डोळे या आजाराचा प्रसार जाणवतो बाधा झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून शिंके द्वारे गोवरचा विषाणू शोषण मार्गातून सूक्ष्म थेंबाच्या स्वरूपात बाहेर पडतो व हवेमार्फत पसरतो लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार गोवर लसीकरण हा रोग टाळण्याचा प्रभावी मार्ग आहे.

काजण्या

कांजण्या हा वरीसेला झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे यामुळे शरीरावर फुडाचे पुंजके उठतात.या रोगांचे लक्षणे आजारापासून ते शरीरावरील विखुरलेल्या छोट्या फोडाच्या जखमा तसेच तीव्र स्वरुपाचा ताप हे सर्वांगीण पुरड स्वरूपाच्या असतात पुरळ उठणे यापूर्वीच्या अवस्थेत सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप पाठदुखी हुडहुडी,अस्वस्थता अशी लक्षणे साधारणपणे 24 तासांपर्यंत राहतात फोडांमध्ये ते साधारणता पुरळ उठणे अगोदर दोन ते तीन दिवस राहतात.पुरड शरीराच्या दोन्ही बाजूस सोडतात प्रथमतः शरीराच्या पुढील व मागील भागावरील प्रमाणात दिसतात. चेहरा हात पायावर ते कमी प्रमाणात आढळतात कांजण्या झालेल्या रुग्णाच्या नाकातोंडातील स्त्राव तसेच त्वचा पासून रोगाचा प्रसार होतो. रुग्णाच्या शरीरावरील खपली धरलेल्या जखमांमुळे कांजण्याचा प्रसार होत नाही.

कुष्ठरोग
कुष्ठरोगाचा उगम आणि प्रसार याबाबतची माहिती आफ्रिकेमध्ये अत्यंत अपुरी आढळून येते. परंतु नायजेरिया युगांडा या देशांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक असल्याचे आधडून येते. कुष्ठ रोगास कारणीभूत असणारा जंतू मायक्रो बॅक्टरियम लेप्री असून त्याचा शोध नार्वे येथील शास्त्रज्ञ डॉ ह्यसन यांनी 1873 मध्ये लावला. त्यामुळेच या जंतू सर्वसाधारणपणे ह्य सन जंतू असे ओळखले जाते. या रोगाचा संसर्ग कोणत्याही वयात होतो. साधारणपणे पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. कुष्ठरोग यामुळे मृत्यू होत नाही. लागण झालेल्या रुग्णांना औषधोपचाराच्या मदतीने संसर्ग खंडित करणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे .त्यामुळे जंतुसंसर्ग प्रमाण कमी होते सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता पाडणे निदान व उपचार. यामध्ये रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे म्हणजे समुपदेशनाची गरज असते.रुग्णांना संपूर्ण शरीराची तपासणी करणे आवश्यक असते. महिला रुग्णांची महिला वैद्यकीय अधिकारी मार्फत तपासणी अथवा महिलेच्या उपस्थित तपासणी करणे.

Leave a Comment

x