ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना Thibak Sinchan Tushar Sinchan Yojana

ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना

सदर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना ठिबक व तुषार सिंचन राबविण्यात येते.

ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना Thibak Sinchan Tushar Sinchan Yojana

1 योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे
2 आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादन पिकांचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती चालना देणे
3 कृषी उत्पादनाची गुणवत्ता आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करणे
4 जल वापर कार्यक्षमतेत वाढ करणे इत्यादी उद्दिष्टे आहेत

लाभार्थी निवडीचे निकष

1 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूचना सिंचन या योजनेसाठी अत्यल्प व अल्पभूधारक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थींची निवड करण्यात येईल
2 शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर सर्व संबंधित संबंधित करार पत्र आवश्यक आहे
3 उपलब्ध सिंचन स्रोततील पाण्याचा विचार करून तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ हा देय असणार आहे
4 विद्युत पंप करता कायमस्वरूपी जोडणे आवश्यक आहे
5 ज्या पिकाकरिता संच बसविण्यात येणार आहे या पिकाची नोंद सात-बाराच्या उताऱ्यावर क्षेत्र सह असावी सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून पीक लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडानुसार अल्प व अत्यल्प भूधारक व अनुसूचित जाती व जमाती मधील लाभार्थ्यांना 70 टक्के अनुदान असणार आहे अल्प व अत्यल्प भूधारक सर्वसाधारण लाभार्थ्यांना 60 टक्के अनुदान देय असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

1 पाणी व मृदा तपासणी अहवाल
2 कंपनी प्रतिनिधीने तयार केलेल्या सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
3भौगोलिक स्थान पद्धतीने शेतकरी व तपासणी अधिकारी समवेत संचाचे अक्षांश आणि रेखांश फोटोची प्रत
4 विक्रेते किंवा वितरक यांच्याकडील बिलांची मुळप्रत टॅक्स इन व्हाइस

अर्ज कोठे करायचा?

सदर योजनेचा इच्छुक शेतकऱ्यांनी http:/dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment

x