शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET Exam)वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा होत आहे.शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.या साठी प्रक्रिया सुरू होत आहे. ही परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे भावी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.सुरवातीला ही तारीख 31 ऑक्टोबर होती पण आरोग्य विभाग गट ड ची परीक्षा ही 31 ऑक्टोबर होत असल्यामुळे आता 30 ऑक्टोबर ला शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येईल.
शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET Exam) वेळापत्रक जाहीर TET Exam Timetable
इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही सीईटी देणे अनिवार्य आहे. या परीक्षेचे सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने टीईटी घेण्यास मान्यता दिली होती.
राज्यातील सरकारी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरकारकडून 6100 शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली असून या पार्श्वभूमीवर शिक्षकांची आता टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे.
TET चे वेळापत्रक
30 ऑक्टोबर 2021
आरोग्य विभाग वेळापत्रक
गट क 24 ऑक्टोबर2021
गट ड 31 ऑक्टोबर 2021
Santosh ladhe patil nandad mahrastr