सतत मास्क वापरल्यामुळे तोंडाचा वास/दुर्गंधी येते..या टिप्स अवलंबवा Teeth Tips

सतत मास्क वापरल्यामुळे तोंडाचा वास/दुर्गंधी येते या टिप्स अवलंबवा

Teeth Tips तोंडाची दुर्गंधी अनेकांची समस्या आहे. रात्री ब्रश करून सुद्धा सकाळी उठल्यावर तोंडाचा वास येतो. त्यामागील कारण असे की आपल्या तोंडात काही प्रमाणात बॅक्टेरिया असतात.जे तोंड कोरडे झाल्यामुळे झपाट्याने वाढतात. त्यामुळे वास येतो. आपण जेव्हा काही खातो तेव्हा तोंडात राहणारे बॅक्टेरिया लाळ एकत्र करतात आणिअन्न आणि प्रथिने तोडतात, ह्या प्रक्रियेत सोडल्या गेलेल्या गॅस मुळे तोंडाचा वास येतो. माऊथवास वापरून आपण तात्पुरत्या स्वरूपात तोंडाची दुर्गंधी आपण दूर करू शकतो.कोराना काळात मास्क वापरल्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येत असेल तोंडाची स्वच्छता व्यवस्थित न केल्याने आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे समस्या उद्भवू शकते.

सतत मास्क वापरल्यामुळे तोंडाचा वास/दुर्गंधी येते..या टिप्स अवलंबवा Teeth Tips

1)तोंडाचा वास न येण्यासाठी दररोज जीभ आणि दात स्वच्छ ठेवा. दिवसातून दोन वेळा ब्रश करावे.

2)दात आणि जीभ स्वच्छ करण्यासाठी टूल किट चा वापर करा. ज्यामध्ये ब्रश आणि जिभेच्या स्वच्छतेसाठी टँगक्लिनर चा वापर करा.

3) काही खाल्ल्यानंतर अन्न कण दातात अडकून बसतात खाल्ल्यानंतर गुळणा करावा.

4) रात्री झोपेतून उठून पाणी प्या.Teeth Tips रात्री तोंड कोरडे होते त्यामुळे लाळ कमी होते आणि बॅक्टेरिया जास्त प्रमाणात होतात आणि तोंडाचा वास येतो.

5) तोंडाच्या दुर्गंधी समस्या सोडवण्यासाठी योग्य आहार घ्या.ताजी फळे भाज्या खाल्ल्याने दात आणि हिरड्या बळकट होतात म्हणून आहारात याचे प्रमाण वाढवा. पोट स्वच्छ ठेवा दिवसा तून किमान आठ-दहा ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Leave a Comment

x