tobacco day in marathi,तंबाखु आणि दारूचे दुष्परिणाम व तंबाखु-दारूबंदी कायदे

लोक तंबाखू आणि दारूचे व्यसन का करतात ?

बरेच लोक हे तंबाखू दारूच्या सवयीला जीवनात बरेच अगोदर प्रारंभ करून घेतात. किशोरावस्था मध्ये इतरांपेक्षा वेगळे व मोठे आहेत दिसण्याच्या नादात किंवा मित्रांसोबत सेवेचा अनुभव घेण्यासाठी त्यांना दुःखात, आनंददायी क्षणात, धूम्रपानाला सुरवात करतो. तर काहीवेळा सामाजिक प्रतिष्ठेचा भाग समजून सवयीला बळी पडतात. म्हणूनच तंबाखू आणि दारूची सवय जडते. काही लोकांमध्ये कमी दारू पिण्यामुळे देखील लगेच परिणाम समोर दिसून येतात.परंतु काही लोकांमध्ये खूप दारू पिल्याने देखील परिणाम दिसत नाहीत. कदाचित हे परिणाम लवकर समोर दिसून पडत नाहीत.हे सुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजे की वेगवेगळ्या भागात दारू पिणे हे स्थानिक रीतीरिवाज मानले जाते. आपले दारू पिणे हे घातक असून याबाबत समाजात दारू मुळे होणारे दुष्परिणाम बद्दल जनजागृती निर्माण करून लोकांचे आरोग्यदायी जीवन बनविणे.

तंबाखू सेवणाच्या वेगवेगळ्या पद्धती

तंबाखूचे सेवन चोडून किंवा ओढून म्हणजेच धुवा सोडणे या प्रकारे केले जाते. सिगारेट,बिडी,चिलीम पाईपचे गार इत्यादी धूम्रपानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. यामध्ये तंबाखू चघळणे ओठा मागे किंवा गालात चूड ठेवणे, गुटखा,माझा,पान मसाला इत्यादी दुसऱ्या गुटखा पेस्टचा वापर करणे आणि नाकाद्वारे वास घेणे आणि नस द्वारे दात घासणे इत्यादी द्वारे केले जाते. सिगारेट ओढल्यामुळे केवळ स्वतःलाच नुसकान होते असे नसून त्याच्या संपर्कातील घरातील लोकांना देखील धूम्रपानामुळे त्रास होतो.अशा व्यक्ती ज्यांच्यामुळे इतरांना त्रास होतो त्याला निष्क्रिय धूम्रपान म्हणतात. लहान मुले आणि महिला बहुतांश धूम्रपानाला बळी पडतात. ह्यामुळे स्वास घेण्यास अडचणी येतात, नाकडोळे ,गळ्यामध्ये जळजळ होणे कानात संसर्ग होणे, आणि दीर्घकाळपर्यंत होत असलेल्या अशा धूम्रपानामुळे मेंदूवर देखील परिणाम होतो.

तंबाखूच्या सेवनामुळे होणारे परिणाम

तंबाखू सेवन हे धोकादायक आहे.यामुळे अल्पकाळासाठी आणि दीर्घकाळासाठी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे परिणाम तंबाखूच्या सेवनाने होते असे नाही कधी कधी सेवन करणाऱ्यांना आणि धुम्रपानास बळी पडणाऱ्या मध्ये देखील होते.तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम सुद्धा होतात जसे डोळ्याच्या समस्या जसे मोतीबिंदू. मुखरोग, गळा पोट घशाच्या कर्करोग अन्ननलिकेचे विकार इत्यादी. क्षयरोग तसेच ह्दय रोग होण्याची शक्यता, रक्तवाहिन्यांचे आजार,उच्च रक्तदाब, किडनी चे आजार, मधुमेह ,गरोदर पणात तंबाखूच्या सेवनामुळे कमी वजनाच्या बाळांचा जन्म. श्वास घेण्यास त्रास होतो.

तंबाखू उच्चाटन कार्यक्रम

भारतात वर्षा 2003मध्ये सिगारेट व तंबाखू उत्पादन अधिनियम पारित करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान निषेध आहे ज्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचे ठिकाण बस स्थानक, रेल्वे, स्टेशन टॅक्सी, शाळा-कॉलेज, पार्क इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे.18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील व्यक्तीला तंबाखू उत्पादने विकण्यास मनाई आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये शंभर मीटर परिसरात तंबाखू सिगारेट व तत्सम पदार्थ विक्रीवर बंदी आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियाच्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी देणे प्रतिबंधित आहे.भारत सरकार द्वारे सन 2007 मध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये तंबाखूमुळे होणारे परिणाम परिणामाविषयी जागृतता निर्माण करणे.तंबाखू नियंत्रण विषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. आरोग्य केंद्रांमध्ये तंबाखू उच्चाटन केंद्राची स्थापना करणे तसेच तंबाखू उत्पादन आदी नियम या कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याची खात्री करणे.

तंबाखू सेवन सोडल्याने काय फायदा होतो?

जर एखाद्या व्यक्ती कोणत्याही प्रकारचे तंबाखूसेवन करीत असेल आणि त्याने तंबाखूसेवन करणे सोडले तर अनेक फायदे होऊ शकतात.ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. कॅन्सरपासून संरक्षण आणि इतर आरोग्यदायी फायदे होतात.सुरुवातीला तंबाखू सोडण्यासाठी फार त्रास होतो या सवय सोडण्यासाठी त्याला त्या व्यक्तीला कौटुंबिक आधाराची गरज आहे.

तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम

जर एखाद्या व्यक्तीने तंबाखू सोडले तर त्याच्यामध्ये काही परिणाम दिसून येतात. जसे सदर व्यक्ती मध्ये पुन्हा तंबाखू सेवन करण्याची इच्छा प्रबळ होते. याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत डोकेदुखी, चींता, बेचैनी, उलट्या होणे, मन उदास होणे, पचन प्रक्रिया अडथळा, भुकेचे वासना वाढणे, थकवा,झोप न येणे अर्धवट झोपणे, गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे,चिडचिडेपणा आणि महत्वाचे म्हणजे धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे. तंबाखू सोडण्याचे परिणाम कमी करण्यासाठी कुटुंबीयांचा आणि मित्रांचा आधार खूप महत्त्वाचा आहे.स्वतःला कामात व्यस्त ठेवणे भरपूर झोप घेणे, भरपूर पदार्थ घेणे, आणि नियमित आहार संतुलित भोजन आणि योगा केल्याने अशी लक्षणे कमी करता येतात.

दारू पिणे

दारू पिण्याचे वेगवेगळे प्रकार

भारतात वेगवेगळ्या प्रकारे दारू पिणे हे सर्वच वयोगटात आणि सर्व वर्गातील लोकांमध्ये आढळून येतात. जसे किशोरवयीन मुले, महिला, तरुण, वयस्कर. दारू पिण्याचे विविध प्रकार आहे जसे स्थानिक फळे, मोहा फुले, गूळ, भाजीपाला, धान्यापासून तयार केलेले दारू, उदाहरणार्थ गावठी ताडी,मोहा इत्यादी.डीस्टिल्ड किंवा विदेशी दारू जसे विस्की, रम इत्यादी. बियर हि स्थानिकरीत्या तयार केली जाणारी अवैध दारू आहे. तथापि हे दारू फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. भारतात दारू पिणे हे फार पूर्वीपासून केला जात आहे. परंतु अलीकडच्या काळात दारूचे दुष्परिणाम जास्त वाढले आहेत याचा अर्थ असा होतो की लोकांमध्ये दारु पिण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की ज्यामुळे अधिक दुष्परिणामांचे प्रमाण वाढले आहे.

दारू पिण्यामुळे काय दुष्परिणाम होतात

दारू पिण्यामुळे हृदयाला आघात होतो हृदयरोग लखवा इत्यादी आजार जडतात. दारू पिण्यामुळे काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर जसे मुख अन्ननलेकीचे गळ्याचे, लिव्हर कॅन्सरची शक्यता वाढते. तसेच साधू पिंडाच्या विकारांमध्ये सुद्धा वाढ होते.दारू पिण्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. मानसिक रोग जसे दारूच्या व्यसनाचे सवय कायम राहणे. आत्महत्या करण्याची वृत्तीत वाढ होणे. स्वभावातील समस्या वाढल्याने अत्याचार करणे, चिडचिडेपणा, अपघात करण्याची वृत्ती, इत्यादी ज्यामुळे जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो .व्यसनाधीन व्यक्तीला कुटुंबातील लोक आणि मित्रपरिवार सोडून देतात. त्याला दुर्लक्षित करतात.

त्यांच्यानंतर त्यांच्यापासून लोक अंतर राहतात. दारूचे व्यसन केल्यामुळे उपजीविकेचे साधन किंवा रोजंदारी सुटते. ज्यामुळे परिवारावर उपासमारीची वेळ येऊ शकते. गरोदर महिलेने दारू सेवन केल्यास बाळंतपणामध्ये गुंतागुंत निर्माण होते. अभ्रकमध्ये जन्मताच व्यंग निर्माण होऊ शकते. भारत सरकारकडून दारू पिण्यावर बरेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जसे बरेच राज्यामध्ये दारू पिण्यावर बंदी आहे तसेच दारू विक्री वर सुद्धा बंदी आहे. किशोरवयीन मुले आणि लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर बंदी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट प्रसार माध्यमातून दारूच्या उत्पादनाविषयी जाहिरातीवर बंदी आहे. दारू पिऊन गाडी चालवणे प्रतिबंधित आहे.

तंबाखू सेवनाने दारूच्या व्यसनांपासून संरक्षित करण्यासाठी आपली भूमिका

तंबाखू सेवन आणि दारूच्या व्यसनांपासून लोकांना संरक्षण करण्याकरता लोकांमध्ये दारु आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. व्यसनाच्या होणाऱ्या आजारपणावर होणाऱ्या खर्चाची देखील त्यांना माहिती द्यावी लागेल. लोकांना याबाबत माहिती देणे गरजेचे राहील कि दारू आणि तंबाखू वर किती जास्त खर्च केल्या जात आहे.तसेच लहान मुले आणि किशोरवयीन मुले यांनादेखील तंबाखू आणि दारूच्या विपरीत परिणामांची माहिती दिली गेली पाहिजे. राष्ट्रीय किशोरवयीन कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुले यांच्या सभेत देखील सदरची माहिती दिली जाऊ शकते.

समाजातील अशा व्यक्ती सोबत कार्य करावयाचे तंबाखू आणि मद्यपानाचे व्यसन आधीन आहेत आणि त्यांना हे व्यसन सोडण्यासाठी आपण प्रोत्साहित करायला पाहिजे.सोबतच त्यांच्या पासून होणारे दुष्परिणाम यांची माहिती त्यांना द्यायला हवी. यासाठी स्थानिक आरोग्य कर्मचारी,आशा गटप्रवर्तक, स्वयंसेवक यांच्याकडून दारू व तंबाखू साठी सहकार्य देऊ शकतो. समाजाच्या स्तरावर ग्राम आरोग्य व पोषण समिती यांच्यामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करावे आयोजन करून हे कळेल की कोणत्या तरुणांना तंबाखू आणि मध्यपान सेवन करण्याची सवय आणि व्यसन आहे आणि ही माहिती समाजापर्यंत पोहोचावे लागेल.

तंबाखू आणि मद्यपानाची उपलब्ध त्याच्याविरोधात समाजाचा लोकसहभाग यासाठी विविध महिला संघटन,आशाचे गट पंचायत समिती सदस्य आणि आरोग्यसेवा प्रदान करणारे करणारे कर्मचारी त्यांचा एकत्रित सहभाग मिळविणे गरजेचे असते जे लोक असांसर्गिक आजारापासून ग्रस्त आहेत त्यांना तपासणीसाठी प्राधान्य देणे व त्यांच्या जीवनशैलीत बदल घडविणे. त्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे जे लोक उच्च रक्तदाब आणि मधुमेह ग्रस्त आहेत. त्यांना या सवय व्यसन सोडण्याचा प्रोत्साहित करावे. असांसर्गिक आजाराला आळा घालण्यासाठी आणि उपचारा बरोबरच आहाराचे तेवढेच महत्त्व आहे.

शरीराला आवश्यक व पुरेसे असे अन्नघटक प्रमाणात पाहिजे. हे वय, लिंग शरीराची रचना व शारीरिक हालचाली वर आधारित असते. जड काम करणाऱ्यांना जास्त खाण्याची आवश्यकता असते जो जास्त शारीरिक काम करत नाही त्याला कमी खाण्याची गरज पडते.सगळ्या खाद्यपदार्थाच्या स्वरुपात संतुलित योग्य प्रमाणात आहार घेतल्याने शरीराची योग्य पूर्तता होते. काही प्रकारच्या चालिरीतीनुसार नुसार खाद्यपदार्थ ज्यांच्या घेण्याचे प्रमाण अधिक राहते उदाहरणार्थ अन्न, बाजरी, डाळ फळे व पालेभाज्या चांगल्या आहाराचे उदाहरण आहे. अशा प्रकारचा आहार खाल्ल्याने शारीरिक संतुलन व आवश्यकतेनुसार शरीराचे वजन स्थिर राहते तसेच असांसर्गिक आजारापासून बचाव होऊ शकतो काही असांसर्गिक आजारांमध्ये आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी चे संतुलन नियोजनाची आवश्यकता आहे तसेच सांसर्गिक आजारी लोकांनी आरोग्य विषयी सल्ला घेतला पाहिजे.

Leave a Comment

x