उष्माघात कसा होतो,उष्माघातावर त्वरित उपाय,उष्माघात पासून कसे सुरक्षित राहाल,sunstroke

उष्माघातापासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवता येईल

मित्रांनो उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता मानवी जीवनाला, पशू-पक्षी यांनाही घातकच असते. उन्हाळ्यातील सूर्याची उष्णता मानवाला असह्य तर असतेच, परंतु ती जीवघेणे ठरू शकते. मानवाने उन्हाळ्याच्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव केला नाही तर उष्माघात येऊ शकतो आणि या उष्माघाताने बळी ही जाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनीही अतिशय दक्ष व सावध राहून या तीव्र उन्हापासून स्वतःच्या शरीराचे रक्षण करून त्यास सुरक्षित ठेवता येते. उष्माघाताचे दुष्परिणाम आपल्यावर ओढवू नयेत किंवा वेळ प्रसंगी आपल्यावर मृत्यू ओढवू नये म्हणून खालील जवाबदारी घेतल्यास आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.

उष्माघात कसा होतो

उन्हात फिरल्याने किंवा काम केल्याने जर थकवा येत असेल किंवा ताप आला असेल तर हे उष्माघाताचे प्रारंभिक लक्षण होय. त्याशिवाय त्वचा कोरडी पडणे भूक न लागणे, चक्कर येणे,भोवड येत आहे असे वाटणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे,मळमळ होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी वाढणे अशी लक्षणे जाणवू लागले की समजावे आपल्याला उष्माघाताचा फटका बसलेला आहे.

उष्माघातावर त्वरित उपाय

वरील लक्षणे ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसतात ती व्यक्ती उष्माघाताची आहे असे समजून त्या व्यक्तीवर त्वरित उपचार करण्यास आरंभ करावा अशी लक्षणे दिसणार्‍या व्यक्तीस त्वरित एका खोलीत ठेवावे त्या ठिकाणी त्वरित पंखा, कुलर ची व्यवस्था करावी रुग्णाच्या शारीरिक तापमान खूप वाढलेले असते ते खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी त्या रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात आईस पॅक लावावे कारण वाढलेल्या शारीरिक तापमान खाली आणणे अत्यंत गरजेचे असते. उष्माघात झालेल्या व्यक्ती क्षीण झालेली असते त्या व्यक्तीवर सलाईन देण्याची व्यवस्था होयला हवी उसमघात झालेल्या व्यक्तींचे सर्व प्रकारचे काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. ग्रामीण भागात जर एखाद्या व्यक्तीस उष्माघात झाला असेल तर लक्षणावरून दिसून आल्यास घाबरून न जाता प्रथम सदरील रुग्णावर प्राथमिक उपचार जसे, गार पाण्याने अंघोळ करणे,गार पाण्याच्या कपडे पट्ट्या ओल्या करून कपाळावर लावणे, हे केल्यानंतर मुख्य उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे आवश्‍यक असते. उन्हाची तीव्रता जशी जशी वाढते या वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे, उन्हाळ्यात दुपारी फिरायला टाळायला हवे. शेतातील कामे रस्त्याचे काम सकाळी लवकर करावी, तसेच गावातील कामे सकाळी दहाच्या आत संपावी किंवा सायंकाळी पाच नंतर आपापली कामे करावीत. उन्हात काम करणे आवश्यकच असेल किंवा गावात जाणे कार्यालयात जाणे आवश्यकच असेल तर डोक्यावर व कानावर पांढरे कापड किंवा टोपी घालून,तसेच डोळ्यावर गॉगल घालूनच जावे. उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्याची कानाची व डोळ्यांची काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी त्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक साधनांचा वापर करावयास हवा उन्हाळ्यात रंगीत कपडे विविध रंगाचे वस्त्र अजिबात वापरू नये.पांढरे वस्त्र व सैल वस्त्र वापरावेत,म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही उन्हाळ्यामध्ये शरीरातून खूप घाम निघतो अशावेळी थकवा जाणवतो यासाठी उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यावे हे पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे. याचीही काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे शेतात किंवा अन्य ठिकाणी काम करणे अनिवार्य असेल तर सतत काम करण्यापेक्षा दर दोन तासांनी सावलीत बसून विश्रांती घ्यावी व पुन्हा कामाला लागावे त्यामुळे उष्माघाताची शक्यता कमी होईल.

Leave a Comment

x