सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना

जर मुलींच्या भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास मुलींचे उज्वल भविष्य निश्चित करण्यासाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेअंतर्गत पालक दहा वर्षांपेक्षा लहान मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana

या योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीच्या उच्चशिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलींसाठी गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना सर्वोत्तम आहे. यामध्ये जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते. हे खाते किमान 250 रुपये द्वारे उघडता येते कोणतीही व्यक्ती या योजनेत एका वर्षात किमान 250 रुपये ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. या खात्यात एकरकमी किंवा हप्त्यात रक्कम जमा केले जाते.

खाते उघडलेल्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत ही रक्कम खात्यात जमा केले जाऊ शकते. या योजनेतून मिळणारे व्याज हे करमुक्त असते. सरकारच्या सर्व बचत योजनांच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजना वरील व्याज अधिक आहे.सरकार प्रत्येक तिमाही सुरुवातीलाच व्याजदर जाहीर करते. जर एखाद्या व्यक्तीने मुलीचे वय कमी असताना पालकांनी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल तर ते या योजनेमध्ये पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा अठरा वर्षाचे झाले की आपण अर्धी रक्कम काढू शकता. त्याचा परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे.मुलगी21 वर्षची झाली की पूर्ण रक्कम काढू शकता.

सुकन्या समृद्धी योजना मध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतच्या रकमेत आयकरात सूट मिळते या योजनेत गुंतवणूक करून कलम 80 सी अंतर्गत लाभ घेता येतो. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सुकन्या समृद्धी योजना खाते सहजपणे बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून काढता येते त्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागेल व तो संबंधित पोस्ट किंवा बँक मध्ये द्यावा लागेल.
बेटी बचाव,बेटी पढाव…..

See also  आंतरराष्ट्रीय युवा दिन 2021 International Youth Day 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x