जास्त जेवल्यानंतर उदभवनाऱ्या पोटफुगी वर उपाय Stomach Bloating

जास्त जेवल्यानंतर होणाऱ्या पोटफुगी वर उपाय

Stomach Boating घरामध्ये जर आवडीचे पदार्थ केले असतील तर आपण यथेच्छ जेवण करतो. ह्या जेवणानंतर पोटफुगी किंवा पोट दुखी याचा अनुभव आपण घेतला असेलच. पोटफुगी मध्ये शरीर जड वाटून अस्वस्थ वाटायला लागते. पोटाची हे समस्या सतत सतावत असते. अशावेळी पोटफुगीवर हे उपाय करून स्वतःची सुटका करून घ्या.

जास्त जेवल्यानंतर उदभवनाऱ्या पोटफुगी वर उपाय Stomach Bloating

1) आपल्या आहारामध्ये पोटॅशियम युक्त पदार्थ उदाहरणार्थ केळी,रताळी,पातक अशा अन्नपदार्थांचा समावेश करा पोटॅशियम मुळे शरीरातील अतिरिक्त द्रव्य बाहेर पडून पोटफुगी कमी होते.

2) सकाळच्या वेळी नाश्ता न करणे हे पण यामागचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे सकाळी फायबर युक्त पदार्थ आपल्या नाष्टा मध्ये समावेश करावा. फायबर युक्त पदार्थ सेवनाने पोट पुष्कळ वेळ भरलेले राहते.

3) आपल्या दिवसातील काही वेळ व्यायाम साठी देणे आवश्यक आहे व्यायाम करणे अशक्य असेल तर शारीरिक हालचाल करा शारीरिक हालचाली मुळे व्यायाम होऊन अन्नपचन सुरळीत होते आणि पोट फुगणे कमी होते.

4) आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थाच्या बरोबरच भरपूर पाणी पिणे देखील समाविष्ट करावे पाणी पिताना थोडे थोडे करून घ्यावे.

5) आपल्या आहारातील मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. मिठाच्या अतिसेवनाने शरीरामध्ये फ्लूईड्स साठ्त राहतात आणि परिणामी पोट फुगू लागते.

6) जर जास्त खाण्यामुळे गॅसेस आणि अपचन झाल्या तरी पोट फुगू Stomach Bloating  लागते अशा वेळी पुदिन्याची पाने घालून केलेला काढा किंवा चहा पोटफुगी कमी करण्यास मदत करतो यामध्ये साखर घालू नये.

Leave a Comment

x