स्टार किसान घर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी आता 50 लाखापर्यंत कर्ज Star Kisan Ghar Yojana

स्टार किसान घर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी आता 50 लाखापर्यंत कर्ज

अनेक बँका शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी वेगवेगळ्या आणि आकर्षक योजना राबवत असतात. या योजनांमध्ये बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर योजना (star kisan ghar yojana) नावाची योजना सुरू केली आहे.

स्टार किसान घर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी आता 50 लाखापर्यंत कर्ज Star Kisan Ghar Yojana

ज्यामध्ये शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळून शेतकरी आपल्या स्वतःचे घर बांधू शकतो. या योजनेअंतर्गत शेतकरी नवीन घर बांधण्यासाठी आणि जुन्या घराच्या दुरुस्ती साठी कर्ज घेऊ शकते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. स्टार किसान घर योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यापासून घराच्या दुरुस्त पर्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा वर्षापर्यंतचा कालावधी दिला जातो या योजनेअंतर्गत शेतकरी घर बांधण्यासाठी किंवा जुने घर दुरुस्ती साठी सहज कर्ज घेऊ शकतात. या योजनेचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा शेतकऱ्यांना आयटी रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज भासणार नाही.

पात्रता

या योजनेचा लाभ फक्त शेतकरी घेऊ शकतो.ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे, ज्या शेतकऱ्यांना शेतजमिनीवर फार्महाऊस बांधायचे आहे किंवा घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करायचे आहे किंवा नवीन घर बांधायचे आहे फक्त ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.बँक ऑफ इंडिया मध्ये kcc खाते असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.आणखी महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ फक्त कृषी कार्यात गुंतलेले शेतकऱ्यांनाच मिळेल.

कर्ज रक्कम मर्यादा

स्टार किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख ते 50 लाख रुपयापर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर नवीन फार्महाऊस किंवा घर बांधण्यासाठी बँकेकडून एक लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.

व्याजदर किंवा व्याजाची रक्कम

योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांना एक लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज हे 8.05% व्याजदराने दिले जाईल. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी पंधरा वर्षाचा कालावधी दिला जाईल. त्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड सहज करू शकता.स्टार किसान योजने स्टार किसान घर कर्ज योजने बाबत अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातील जवळच्या बँक ऑफ इंडियाच्या(Bank of India) शाखेशी संपर्क साधू शकता आणि सहज कर्ज उपलब्ध करू शकता.

1 thought on “स्टार किसान घर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी आता 50 लाखापर्यंत कर्ज Star Kisan Ghar Yojana”

Leave a Comment

x