दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच SSC HSC Board Exam Offline

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच

विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर एक महत्वाची बातमी ती म्हणजे परीक्षेबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. जरी शाळा, महाविद्यालय बंद असले तरी परीक्षांची तयारी जोमाने करा कारण दहावी बारावीच्या परीक्षा बोर्डाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत त्यात सध्या तरी कोणताही बदल झालेला नाही.

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच SSC HSC Board Exam Offline

बोर्डाचा परीक्षा घेण्यावर राज्य शिक्षण मंडळ ठाम आहे. अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास त्या त्यावेळी राज्य सरकारच्या निर्णयानुसार बदल होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत त्या दृष्टीने शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जात आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांनी परीक्षा बाबत संभ्रम निर्माण करून घेऊ नये.

सध्या शाळांमध्ये सराव परीक्षा सुरू असून विद्यार्थ्याकडून लेखनाचा सराव करून घेण्यात येत आहे अंतर्गत मूल्यमापन, स्वाध्याय प्रकल्प, नोंदवह्या पूर्ण करणे प्रात्यक्षिक परीक्षा सराव ही तयारी शाळांनी सुरू केली आहे. बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी सक्षम अशी कोणतीही यंत्रणा नाही. परीक्षेचे स्वरूप व्याप्ती विषय विद्यार्थ्यांची संख्या पाहता बोर्डाची परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नाही. त्यामुळे होणारी परीक्षा ही ऑफलाईन असणार असून वेळापत्रकानुसारच होईल. वेळापत्रकामध्ये कोणताही बदल झालेला नाही असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोस्वामी यांनी सांगितले आहे.

शाळांमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे परंतु आता पुन्हा शाळा बंद झाल्याने यात खंड पडला आहे. किमान दहावी बारावीचे वर्ग नियमित सुरू ठेवा किंवा या विद्यार्थ्यांचे दिवसाआड शाळा करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षा मार्च एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी चांगल्या प्रमाणे करता येणार आहे.

Leave a Comment

x