एखाद्याने आपल्या बँक खात्यातून पैसे उडवले तर काय करावे squander money

एखाद्याने आपल्या बँक खात्यातून पैसे उडवले तर काय करावे

ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत आहेत. खात्यातील सर्व माहिती काढून हैकर्स खात्यातून पैसे काढत आहेत. बँका आणि आरबीआय आपल्या ग्राहकांना सतर्क करत राहतात. कोणत्याही प्रकारची माहिती किंवा ओटीपी शेअर करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे फसवणूक झाल्यास त्वरित बँकेला कळविण्याचा सल्ला बँकांनी दिलेला आहे. बँकेला सूचना दिली तर नुसकान कमी करू शकता.

एखाद्याने आपल्या बँक खात्यातून पैसे उडवले तर काय करावे

जर एखाद्याने फसवणूक केली तर पूर्ण पैसे परत कसे मिळवायचे याबाबत जर आपण बँक खात्यातून पैसे काढण्या बद्दल तक्रार केली तर बँक पैसे परत करेल. वास्तविक अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीचा विचार करून बँक विमा पॉलिसी घेतात. बँक फसवणुकीचे सर्व माहिती थेट विमा कंपनीला सांगेल आणि तेथून विम्याचे पैसे घेऊन आपल्याला नुकसानीची भरपाई करेल.सायबर फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या लोकांना थेट कव्हरेज देत आहेत.

जर कोणी फसवणूक केली तर तीन दिवसाच्या आत बँकेत तक्रार केली तर आपल्याला झालेले नुकसान सहन करावे लागणार नाही. बँकेला माहिती दिल्यानंतर दहा दिवसाच्या आत आपली रक्कम बँक खात्यात परत दिली जाईल.जर तीन दिवसानंतर 4 ते 7 दिवसात माहिती दिले तर ग्राहकाला 25 हजार रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागेल.

जर बँक अकाउंट बेसिक सेविंग बँकिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट असेल तर आपले लायबिलिटी पाच हजार रुपये असेल. बँक खात्यातून दहा हजार रुपये अनाधिकृत व्यवहार झाला तर तुम्हाला बँकेतून पाच हजार रुपये परत मिळतील उर्वरित पाच हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. बचत खाते, क्रेडिट कार्ड संदर्भात व्यवहार झाला असेल तर नियम खात्यानुसार लायबिलिटी वर आधारित असेल.कोणाच्याही बाबतीत असा अनाधिकृत व्यवहार झाला तर लवकरच बँक ला माहिती देऊन नुकसान टाळा.

Leave a Comment

x