जर फ्रीज चा वास येत असेल तर ह्या टिप्स फॉलो करा Solutions for refrigerator smell

जर फ्रीजमधून वास येत असेल तर ह्या टिप्स फॉलो करा

फ्रीज चा वापर आपण पदार्थ दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी करत असतो.बऱ्याच वेळा फ्रीजचे दार उघडताच वास यायला लागतो. बरेच दिवस फ्रिज मध्ये काही पदार्थ सोडू लागतात आणि ते दुर्गंध पसरवितात.अनेकदा काही पदार्थ झाकण न ठेवल्यामुळे सुद्धा फ्रीजला वास येऊ लागतो. बऱ्याच वेळा इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे सुद्धा फ्रीजचा वास येत असतो. तेव्हा काही टिप्स फॉलो केल्या तर फ्रीज चा वास येणार नाही.

जर फ्रीज चा वास येत असेल तर ह्या टिप्स फॉलो करा Solutions for refrigerator smell

1) लिंबू हे फ्रीजमधील वास दुर्गंध दूर करण्यासाठी वापरले जाते.लिंबा मध्ये आंबट गंध फ्रीजमधील वास सहजपणे काढण्यास मदत करते. लिंबाचा अर्धा भाग कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रीजचा वास येणार नाही.

2)पुदिना मध्ये गंध कमी करण्याची क्षमता असते एखाद्या भांड्यामध्ये पुदिना ठेवू शकता किंवा फ्रिज साफ करताना पुदिना अर्क वापरू शकता.

3) फ्रिजमध्ये सतत जास्त वास येत असेल तर एका कप्पे मध्ये बेकिंग सोडा ठेवा वास येणार नाही.

4) संत्रे हे सुद्धा आपल्या गुणधर्मामुळे वास दूर करण्यास परिणाम कारक आहे संत्र कापून जर ठेवले तर वास येणार नाही.

5) फ्रीजचा वास येऊच नये यासाठी फ्रीज वारंवार साफ करणे गरजेचे असते. आठवड्यातून दोन दिवस जर आपण फ्रिज साफ केले तर वास येणार नाही. सडलेले पदार्थ, फ्रीजमध्ये सांडलेले पदार्थ यामुळे फ्रीजला वास येत असतो त्यामुळे वारंवार फ्रीज साफ करा.आणि वारंवार वास येण्याची समस्या दूर करा.

Leave a Comment

x