Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरीसाठी आता 4 लाख रुपये अनुदान
शेतकरी मित्रांनो महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय प्रकाशन झाला आहे. विहिरीसाठी अर्ज प्रक्रियेत शासनाकडून नियमांमध्ये शिथिलता करण्यात आलेले आहे.
या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी आता शासनाद्वारे चार लाख रुपये अनुदान Sinchan Vihir Anudan देण्यात येणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा आणि तो कुठे करायचा? कोणते कागदपत्रे हवे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
विहिरीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज करता येतो हा अर्ज सुरुवातीला तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये दाखल करू शकता. तुमच्या गावात ग्रामपंचायत मार्फत अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढे पंचायत समितीमध्ये दाखल केला जातो पंचायत समिती येथे रोजगार हमी विभाग मार्फत तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला विहीर खोदण्यासाठी अनुमती दिली जाते व त्यानंतर टप्प्यात 4 लाख अनुुुदान दिले जात.