शबरी आदिवासी घरकुल योजना Shabari Aadivasi Gharkul Yojana

शबरी आदिवासी घरकुल योजना

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र या आदिवासी उपयोजना अंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी भव्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या नागरिकांसाठी घरांचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेल्या पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमलात आणली गेली आहे. या आदिवासी लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सौचालय बांधण्यास स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची ही तरतूद देखील करण्यात आली आहे.

शबरी आदिवासी घरकुल योजना Shabari Aadivasi Gharkul Yojana

शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना स्वतःचे राहण्याचे पक्की घरे नाहीत. त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देणे आदिवासी लोक हे मातीच्या घरात झोपडीत किंवा तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात.त्यांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधणी करण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळते.

शबरी आदिवासी आवास योजना साठी पात्रता

1)लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
2)लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये तर नगर परिषदांसाठी दीड लाख रुपयांचे महानगरपालिका क्षेत्रासाठी दोन लाख रुपये असणे आवश्यक आहे.
3) लाभार्थ्यांकडे राहण्यासाठी पक्के घर नसावे.
4) पात्र लाभार्थ्यांना कडे स्वतःचे घर बांधण्यासाठी जमिन किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
5) निराधार दुर्गम भागातील आदिवासी विधवा या लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल.

शबरी आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1)रहिवासी प्रमाणपत्
2) जातीचे प्रमाणपत्र
3) जागेचा सातबारा आणि 7अप्रमाणपत्र
4)शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा
5) जागा उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र
6)ग्रामसभेचा ठराव
7)तहसिलदाराकदिल उत्पन्न प्रमाणपत्र

शबरी आवास योजनेअंतर्गत या मर्यादेपर्यंत लाभ देणे आहे

1) ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये एक लाख बत्तीस हजार एवढे घराची किंमत मर्यादा असेल.
2) नक्षलग्रस्त डोंगर क्षेत्रासाठी एक लाख 42 हजार एवढे करायची किंमत मर्यादा
3)महानगरपालिका क्षेत्राकरीत घराची किंमत मर्यादा दोन लाख रुपये एवढी असेल.
शबरी आवास योजना अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पत्त्यावर संपर्क करावा आणि योजने संबंधित अधिक माहिती मिळवावी

Leave a Comment

x