5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख अखेर जाहीर Scholarship exam date declared

5 वी आणि 8 वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेची तारीख अखेर जाहीर

शिक्षण विभागातील शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा Maha TET घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे.त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचबरोबर आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख अखेर जाहीर Scholarship exam date declare

कोरोनाच्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या परीक्षेची तारीख जाहीर झाली असून दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा ही 8 ऑगस्ट 2021 ला होणार आहे,या बाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

कोरोना नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री यांनी सांगितले आहे.ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सन 2020-21च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक परीक्षा इयत्ता आठवी करोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून 8 ऑगस्ट 2021 ला घेण्यात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आलेली आहे.

Leave a Comment

x