स्टेट बँक ऑफ इंडिया SBI चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा SBI alert pan aadhar link

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI )चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा.

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआय ओळखली जाते.स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर याला कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया SBI चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा SBI alert pan aadhar link

भविष्यात येणाऱ्या अडचणी पासून बचाव करायचा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकाने पॅन आणि आधार कार्ड लिंक करून घ्यावे.एस बी आय ने 30 सप्टेंबर पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत निश्चित केलेली आहे. ग्राहकांना बँकेच्या सेवेचा कोणत्याही अडचणी शिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करून घेणे आवश्यक आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाहीतर अकाउंट बंद होऊ शकते.

पॅन कार्ड आधार लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅन कार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत दहा हजार रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर ग्राहकाने 31 मार्च पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड बंद होऊ शकतं. बऱ्याचशा ग्राहकाने आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेले असेल आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बँक यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल नाहीतर अडचणी निर्माण होतील. तेव्हा पॅन कार्ड आधार शी लिंक नसेल तर लगेच करून घ्या.

Leave a Comment

x