संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना

संजय गांधी योजना राज्यातील निराधार, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, वृद्ध व्यक्ती,अंध अत्याचारित महिला, अपंग शारीरिक,विधवा,वेश्या व्यवसायातून मुक्त महिला तसेच घटस्फोटित महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देश ने संजय गांधी निराधार अनुदान योजना 1980 पासून राबविण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana

या योजनेअंतर्गत राज्यातील 65 वर्षाखालील वयाच्या निराधार लोकांना मदत दिले जाईल या योजनेअंतर्गत गरीब महिला अनाथ मुले व कोणत्याही आजाराने ग्रासलेल्या लोकांना मदत दिली जाईल. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब लोकांना मदत करणे निराधार लोकांना या योजनेतून मासिक पेन्शन मिळणार आहे. निराधार लोकांना आर्थिक साहाय्य करणे आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे लाभ कोण घेऊ शकतो?

65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती,वृद्ध व्यक्ती, अंध,विधवा वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, घटस्फोटीत महिला, निराधार पुरुष व महिला,अनाथ मुले अपंग आतील सर्व प्रवर्ग, कुष्ठरोग,क्षयरोग,कर्करोग यासारख्या आजाराने पीडित महिला व पुरुष, निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित महिला, तृतीयपंथी, देवदाशी, 35वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कयद्याची पत्नी, सिकलसेल ग्रस्त.
– लाभार्थ्यास दरमहा 600 सहाशे रुपये अनुदान देण्यात येते. जर लाभार्थ्याच्या कुटुंबात एका पेक्षा जास्त पात्र उमेदवार असल्यास कुटुंबाला रुपये 900 दरमहा देण्यात येतात.

संजय गांधी निराधार पेन्शन योजना पात्रता व अटी

1) कमीत कमी पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) अर्जदाराचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे
3)कुटुंबाचे उत्पन्न प्रति वर्षे रुपये 21000 पर्यंत असणे आवश्यक आहे.

संजय गांधी निराधार योजने साठी लागणारी कागदपत्रे
1 महाराष्ट्र निवासी प्रमाणपत्
2 अपंगत्वाचे प्रमाणपत्र
3 वय प्रमाणपत्र
4 बीपीएल प्रमाणपत्र
5 कौटुंबिक उत्पन्न हे सिद्ध करण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकीत उतारा
6 मोठा आजार झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र

निराधार योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आहा फॉर्म तहसिल ऑफिस मध्ये द्यावा. अर्जाची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक. राज्यसरकार लाभार्थ्यांची यादी जाहीर करेल आणि निराधार व ज्यांना बहुतेक पेन्शनचे आवश्यकता आहे अशा लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात येईल. सर्व लाभार्थ्यांना पेन्शनची रक्कम तहसीलदाराच्या माध्यमातून वितरित केले जाईल. संजय गांधी निराधार अनुदान पेन्शन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जबाबदार आहे अधिक माहितीसाठी अर्जदार आपल्या भागातील संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधू शकतात.

Leave a Comment

x