आरटीई 2022 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कागदपत्रांची यादी जाहीर RTE Admission 2022-23

आरटीई 2022 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कागदपत्रांची यादी जाहीर

आरटीई( RTE) प्रवेश प्रक्रिया 2022 शिक्षण हक्क कायदा अंतर्गत देण्यात येणाऱ्या 25 टक्के प्रवेश यांचे 2022-2023 या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केले आहे.

आरटीई 2022 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कागदपत्रांची यादी जाहीर RTE Admission 2022-23

या वेळापत्रकानुसार 28 डिसेंबर ते 9 मे दरम्यान आरटीइ प्रवेश प्रक्रिया आयोजन करण्यात येणार आहे 28 डिसेंबर पासून राज्यातील आरटीईअंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी सुरू होणार आहे.27 जानेवारी पर्यंत तपासणी सुरू राहणार असून त्यानंतर आरटीई(RTE) प्रवेशासाठी राज्यात उपलब्ध शाळा आणि प्रवेश यांच्या जागा जाहीर करण्यात येतील. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान पालकांना आरटीइ प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. 8 किंवा 9 मार्चला आरटी प्रवेश यांचे सोडत निघणार असून त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल असे संभाव्य वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालयना काढून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदला बाबांची माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यंदा करण्यात आलेला मोठा बदल म्हणजे निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य न धरण्याचे शासनाने आदेश दिले आहेत त्याऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असून इतर पतसंस्था स्थानिक बँकेचे खाते पुस्तक ग्राह्य धरले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मागील वर्षापर्यंत आरटी प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका,वाहन चालवण्याचा परवाना वीज,दूरध्वनी,गॅस पासबुक,आधार कार्ड,मतदान कार्ड ओळखपत्र,,बँक खाते पुस्तक आणि ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी नोंदणीकृत असलेल्या भाडेकरार यापैकी कोणताही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाणार होते. त्यात आता बदल करण्यात आला आहे. रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल देयक, प्रोपर्टी टॅक्स देयक,घरपट्टी,आधार कार्ड,मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.हे कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य किंवा अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यातील भाडेकरार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी.

See also  शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET Exam) वेळापत्रक जाहीर TET Exam Timetable

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x