गजकर्णावर जालिम रामबाण उपाय
मित्रांनो पावसाळा आता सुरू झाला आहे. तब्येतीच्या अनेक समस्यांना या ऋतूमध्ये सामोरे जावे लागते. त्वचेला खाज सुटणे,त्वचा लालसर होणे,खरूज, नायटा,गजकर्ण यासारखे त्वचेचे आजार होत असतात.गजकर्ण हे एक फ़ंगल इंजेक्शन आहे. संसर्ग व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येऊन तसेच एकमेकांचा टॉवेल,कपडे अशा वस्तू वापरल्या ने देखील हे इन्फेक्शन पसरते. गजकर्ण किंवा नायटा होऊ नये यासाठी नियमित आंघोळ करावी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. बाजारातील अनेक क्रीम वरून सुद्धा इन्फेक्शन कमी होत नाही तेव्हा रामबाण उपाय म्हणून काही टिप्स फॉलो केले तर गजकर्णपासून आराम मिळेल.
गजकर्ण वर जालीम रामबाण उपाय Remedies for Ringworm
1) Ringworm कोरफड आपल्याला माहितीच आहे कोरफड घेऊन त्यामधील गर एका वाटीमध्ये काढून घ्यावा. नंतर देवघरातील कापुराच्या दोन वळ्या घ्याव्यात.तिसरा पदार्थ म्हणजे खोबरेल तेल थोड्या प्रमाणात घेऊन याचा लेप तयार होईल याप्रमाणे मिश्रण तयार करावे गजकर्ण झालेल्या जागेवर हा लेप कापसाच्या बोळ्याने लावायचा आहे, असे दिवसातून दोन वेळा दोन ते तीन दिवस केल्यास गजकर्ण नाहीसे होईल.
2) गजकर्ण झालेले जागा गरम पाण्याने स्वच्छ धुऊन पाण्यात वाटलेले मोहरी लेप करून लावावी.
3) गजकर्ण झालेल्या जागेवर कच्च्या पपई फोड असल्यास किंवा पपईच्या बिया वाळवून त्याची पूड पाण्यात कालवून ति त्यावर लावावे.
हे उपाय करून सुद्धा गजकर्ण कमी होत नसेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला किंवा उपचार घ्यावा.