कोरडा खोकल्यावर रामबाण उपाय Remedies for cough

कोरडा खोकल्यावर रामबाण उपाय

कोराना विषाणूच्या वाढत्या संक्रमणने आज भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे. कोरोना चे पहिले लक्षण म्हणजे कोरडा खोकला आणि ताप. साधारण खोकला आणि covid-19 आजारातील खोकला ओळखणे कठीण झाले आहे त्यामुळे भीतीचे वातावरण तयार होते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला व तपासण्या द्वारे कोरडा खोकल्याचा प्रकार आपण जाणून घेऊ शकतो. आपल्याला माहीतच आहे की कोरडा खोकलात कफ तयार होत नाही. कोरड्या खोकल्याची अनेक कारणे आहेत उपचार करून सुद्धा खोकला कमी होत नाही अशा वेळी काही घरगुती उपाय अमलात आणल्यास कोरडा खोकला कमी होतो चला तर मग जाणून घेऊया कोरड्या खोकल्यावर रामबाण उपाय.

कोरडा खोकल्यावर रामबाण उपाय Remedies for cough

1) औषधोपचार घेऊन सुद्धा कोरडा खोकला कमी होत नाही अशा वेळी हा रामबाण उपाय ठरतो. चार ते पाच दिवसांमध्ये तुमचा कोरडा खोकला बरा होईल यासाठी एक चमचा गूळ, एक चमच सुंठपावडर, एक चमचा जेष्ठमध आणि दोन चमचे तीळ तेल घ्यावे, यांचे मिश्रण करून चाटण तयार करावे दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायचे आणि त्यावर गरम पाणी प्यावे. हा उपाय चार ते पाच दिवस करायचा कोरडा खोकला बरा होईल.

2) कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणे हा रामबाण उपाय मानला जातो. Remedies for caugh मधामुळे घशातील खवखव कमी होते.ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या दोन चमचे मध मिक्स करा आणि ते प्या कोरडा खोकला पासून आराम मिळेल.

3) ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो.कपभर पाण्यामध्ये एक चमचा ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा, दहामिनिटे उकळून हे घ्या.

4) हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकला कमी होत नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत होते हळदीतील घटकामुळे सर्दी खोकला आणि श्वसनाचे संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.

See also  tobacco day in marathi,तंबाखु आणि दारूचे दुष्परिणाम व तंबाखु-दारूबंदी कायदे

5) कोरडा खोकला साठी वेलदोडा गुणकारी आहे दिवसातून दोन वेळा वेलदोडा चावून खाल्ल्यास खोकला कमी होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x