रेशन कार्ड आता घरबसल्या बनवा एका क्लिकवर Ration Card

रेशन कार्ड आता घरबसल्या बनवा एका क्लिकवर

रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड हे फक्त रेशन मिळविण्यासाठीच वापरले जात नाही तर ते ओळखपत्र म्हणूनही काम करते.

रेशन कार्ड आता घरबसल्या बनवा एका क्लिकवर Ration Card

आता देशभरात वन नेशन वन कार्ड योजना लागू झाल्यानंतर लोकांसाठी रेशन कार्ड जास्त महत्वाचे झाले आहे. एखाद्या व्यक्तीकडे रेशन कार्ड हे आधार आणि पॅन कार्ड इतकेच महत्त्वाचे आहे.रेशन कार्ड चे तीन प्रकार असून दारिद्र्यरेषेच्या वर APL दारिद्र्यरेषेखालील BPL आणि अंत्योदय कार्ड. अत्यंत गरीब लोकांना अंत्योदय योजनेचा लाभ दिला जातो. हे कॅटेगिरी व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे ठरविली जाते. आता आपण स्मार्टफोन वरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करून ते मिळवू शकता. तुम्ही ज्या राज्याचे रहिवासी आहात त्या राज्याच्या वेबसाईटवर जा आणि रेशन कार्ड साठी अर्ज करा.

रेशन कार्ड काढण्यासाठी पात्रता व अटी

1 रेशन कार्ड काढण्यासाठी भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
2 कोणत्याही राज्याचे रेशनकार्ड नसावे
3 वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे
4 कुटुंबप्रमुखाच्या नावावर रेशन कार्ड असते
5 कुटुंबप्रमुखाचे इतर सदस्यांचे जवळचे संबंध असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा

1 सर्वप्रथम तुम्ही ज्या राज्याचे रहिवासी आहे त्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा. यानंतर Apply for ration card लिंक वर क्लिक करा.
2 रेशन कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र आधार कार्ड मतदार ओळखपत्र आवश्यक
3 अर्ज भरल्यानंतर नाममात्र फी भरून अर्ज सबमिट करा
4 अर्ज फिल्ड वेरिफिकेशन साठी पाठविला जातो अधिकारी फॉर्म भरलेल्या माहितीचे व्हेरिफिकेशन करते
5 साधारणपणे ही चाचणी अर्ज केल्यानंतर 30 दिवसाच्या आत पूर्ण होते त्यानंतर पुढील प्रक्रिया होते
6 सर्व डिटेल्स चे व्हेरीफिकेशन केल्यानंतर रेशन कार्ड तयार होते कोणते डिटेल्स चुकीचे आढळल्यास अर्जदार वर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

See also  मुलांची हुशारी दिसून येण्यासाठी दररोज खायला द्या हे पदार्थ Brain Food

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x