आता रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याची नोंदणी प्रक्रिया झाली सोपी Ration Card add new member process

आता रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याची नोंदणी प्रक्रिया झाली सोपी

देशभरातील गरीब कुटुंबीयांना रेशन कार्डच्या माध्यमातून रेशन मिळते. रेशन कार्ड(Retion Card) राज्य सरकार बनवते आणि ते आधार कार्ड शी जोडलेले असते.त्यामध्ये कुटुंबातील कोणतेही सदस्य आंगठा लावून बायोमेट्रिक पद्धतीने रेशन घेऊ शकतो.

सरकारने आता देशात कुठेही रेशन काढून रेशन घेण्याची सुविधा सुरू केली आहे. शासनाने रेशन कार्ड(Retion Card) च्या माध्यमातून गरीब जनतेला विविध फायदे दिले आहेत.रेशन कार्ड मध्ये बदल करण्याच्या समस्यांमुळे लोक अनेकदा चिंतेत असतात. घरातील नवीन सदस्याचे नाव नेशन कार्ड वर टाकायचे असेल तर ते आता शक्य झाले आहे. नवीन रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन होत असल्याची माहिती समोर आली आहे.

घरातील एखाद्या नवीन सदस्याचे(New member) नाव नोंदणीसाठी आता खालील स्टेप्स फॉलो केल्या तर नवीन सदस्यांची नोंदणी होत आहे.
1 सर्वप्रथम राज्याच्या अन्नपुरवठा च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2 रेशन कार्ड(Retion Card) अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आयडी तयार करणे आवश्यक आहे.
3 त्यानंतर ॲड न्यू मेम्बर (add new member)हे पर्याय उपलब्ध आहे त्यावर क्लिक करा.
4 साइटवर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल आता तुम्ही तुमचे कुटुंबाचा तपशील अपडेट करू शकता.
5 फॉर्मसोबत कागदपत्राची कॉपी देखील अपलोड करावी लागेल.
6 फॉर्म सबमिट(submit) केल्यावर तुम्हाला नोंदणी(registration number) क्रमांक मिळेल.
7 तुम्ही पोर्टलवरून फॉर्मचा मागोवा घेऊ शकता त्यानंतर कागदपत्रे आणि फार्मची पडताळणी होते.
8 फॉर्म स्वीकारल्यानंतर रेशन कार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरी येते.

नवीन नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे(documents)
1 आधार कार्ड
2 कुटुंबातील सदस्य पासपोर्ट आकाराचे डिजिटल फोटो
3 पॅन कार्ड
4 मोबाईल नंबर
5 उत्पन्नाचा दाखला
6 विज बिल
7 बँक पासबुक पासबुक चा पहिला पानाची डिजिटल फोटोकॉपी
8 गॅस कनेक्शन माहिती
इ आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.ऑनलाईन प्रक्रियेमळे आता आधार कार्ड काढणे तसेच नवीन सदस्याचे नाव नोंदणी करणे आता सोपे झाले आहे.

See also  घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा आणि वीस वर्षापर्यंत फुकटात वीज मिळवा Solar Rooftop Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x