कोणत्या रेशन कार्ड वर किती मिळते धान्य जाणून घ्या Ration Card

कोणत्या रेशन कार्ड वर किती मिळते धान्य जाणून घ्या

केंद्र आणि राज्य सरकार गरीब गरजूंना अतिशय कमी किमतीत धान्य पुरवतात यावर त्यांची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र शिधापत्रिका ( रेशन कार्ड) दिले जाते.

कोणत्या रेशन कार्ड वर किती मिळते धान्य जाणून घ्या Ration Card

प्रत्येक रेशन कार्ड(Ration card) वर मिळणारे धान्य ची रक्कम ठरलेली असते. लाभार्थ्याला या योजनेतील दर महिन्याला प्रति परिवार 35 किलो धान्य मिळते. ज्यात 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ सामील आहेत. लाभार्थी दोन रुपये प्रति किलो दराने गहू आणि तीन रुपये किलोने तांदूळ खरेदी करू शकतात हे रेशन कार्ड केंद्र सरकारकडून अशा भारतीय नागरिकांना दिले जातात जी अत्यंत गरीब येतात. या कार्डवर इतर कार्डच्या तुलनेत अधिक धान्य मिळते. जाणून घेऊया कोणत्या कार्ड वर किती राशन मिळते.

1)बीपीएल रेशनकार्ड(BPL)

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बीलो पोवर्टी लाइन्स बीपीएल(BPL) रेशन कार्ड जरी केले जाते या रेशन कार्ड वर दहा ते वीस किलो धान्य प्रति महिन्याला एका कुटुंबाला दिले जाते. रेशन कार्ड वरील धन्याचा हे प्रमाण प्रत्येक राज्यातील वेगवेगळे असू शकतात तसेच धान्याची किंमत ही राज्य सरकारवर अवलंबून असते.

2) अंत्योदय रेशन कार्ड योजना

कोरोना काळात मोदी सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती. त्याचा लाभ मार्च 2022 पर्यंत मिळणार आहे. त्याशिवाय विविध योजना अंतर्गत धान्य वाटप केले जाते या योजनेमध्ये मोफत धान्य मिळत नाही. परंतु बाजार भाव पाहून अतिशय कमी किमतीत गरजूंना धान्य उपलब्ध करून दिले जातात.

3) एपीएल रेशन कार्ड(APL)

दारिद्र्यरेषेवरील लोकांना अबो पोवर्टी लाईन एपीएल(APL) रेशन कार्ड जारी केला जाते एपीएल रेशन कार्ड वर दर महिन्याला दहा ते वीस किलो ग्राम धान्य मिळते. धान्याची किंमत राज्य सरकार ठरवत असल्याने या किमती वेगवेगळ्या राज्यात बदलतात.

4 )प्राथमिकता रेशन कार्ड

प्राथमिकता रेशन कार्ड वर दर महिन्याला पाच किलो रेशन प्रतिव्यक्ती मिळते यात तांदूळ तीन रुपये प्रति किलो आणि गहू दोन रुपये प्रति किलो दराने मिळते.

5) अन्नपूर्णा रेशन कार्ड

अन्नपूर्णा योजना अंतर्गत रेशन मिळते जे गरीब लोकांना तसेच 65 वर्षावरील वृद्धना दिले जातात या दर महिन्याला दहा किलो रेशन मिळते राज्य सरकारने जरी केलेल्या त्याच्या विविध नामांकन अंतर्गत येणाऱ्या वृद्धांना जारी करतात त्यानुसार धान्याचे प्रमाण आणि किमती प्रत्येक राज्यात बदलू शकतात.

Leave a Comment

x