रेशन कार्ड नसले तरी मोफत अन्नधान्य मिळणार Ration Card

रेशन कार्ड नसले तरी मोफत अन्नधान्य मिळणार

सर्वसामान्यांना रेशनकार्ड(Ration card) दारे स्वस्त दरात अन्नधान्य मिळते त्यासाठी रेशन कार्ड असणे महत्वाचे आहे गरजेचे आहे.

रेशन कार्ड नसले तरी मोफत अन्नधान्य मिळणार Ration Card

रेशनकार्ड(Ration card) हे महत्वाचे दस्तऐवज  आहे.इतर ठिकाणी सुध्दा रहिवासी पुरावा म्हणून आपण रेशनकार्ड वापरत असतो. रेशन कार्डधारकांना रेशन कार्ड मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर रेशन कार्ड वेळोवेळी अपडेट(update) ठेवणे महत्त्वाचे असते. नुकतेच रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे रेशन कार्ड अपडेटस बाबत सर्व माहिती एसएमएसद्वारे(SMS) ग्राहकांना देण्यात येणार आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारने विविध राज्यांमध्ये काही महिन्यासाठी मोफत अन्नधान्य दिलं. आता ही केंद्र सरकार कडून मोफत देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये मोफत अन्नधान्य दिले जात आहे वन नेशन वन रेशन कार्ड(one nation one ration) योजनेद्वारे तर राज्यातील जनतेला मोफत अन्नधान्य मिळण्यास सुरुवात झाली आहे.दिल्लीशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड या राज्यात आधीपासूनच विना रेशन कार्ड अन्नधान्य दिले जात आहे.

रेशन कार्ड नसतानाही मोफत धान्य कसं मिळवायचं हे आपण आज जाणून घेऊया. दिल्ली सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजनेनुसार अन्नधान्याचं पीओएस च्या माध्यमातून वितरित केले जात आहे. यानुसार लाभार्थ्यांना विना रेशन कार्ड मोफत धान्य मिळू शकतात मात्र यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्ड किंवा बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे.त्यामुळे तुम्हाला रेशनकार्ड शिवाय अन्नधान्य हवं असेल तर रेशनकार्ड आधार किंवा बँक खात्या सह लिंक असणं गरजेचं आहे.

Leave a Comment

x