कोरोना काळात पल्स ऑक्सिमिटर द्वारे ऑक्सिजन पातळी कशी तपासावी Puls Oximeter

कोरोना काळात पल्स ऑक्सि- मीटरद्वारे ऑक्सिजन पातळी कशी तपासावी?

कोरोना काळात प्लस ऑक्सी मीटर द्वारे ऑक्सिजन पातळी वारंवार तपासणे गरजेचे आहे. Puls Oximeter नवीन कोरोना स्ट्रेन मुळे कोरोना ची लक्षणे सुद्धा वेगळे आहेत. मनात प्रश्न आला असेल ऑक्सीजन पातळि कोणी तपासावी.जर आपणास ताप,सर्दी,खोकला अथवा कोरोना ची नवीन लक्षणे आढळत असतील तर तसेच होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णानी ऑक्सिजन पातळी तपासावी.

कोरोना काळात प्लस ऑक्सिमिटर द्वारे ऑक्सिजन पातळी कशी तपासावी Puls Oximeter

चाचणी करताना बोटात पल्स ऑक्सि मीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची पातळी नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसाच बोटात ठेवून घरात पाच मिनिटे सपाट जमिनीवर चालत राहावे. चालताना वेगाने किंवा मंदगतीने चालू नये मध्यम गतीने चालावे. पाच मिनिटानंतर पुन्हा ऑक्सिजनची पातळी नोंद घ्यावी. पाच मिनिटे चालून ही ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तब्येत उत्तम आहे असे समजावे. ऑक्सीजन एक किंवा दोन टक्‍क्‍याने कमी होत असेल तर काळजी न करता पुन्हा चाचणी करावी चाचणीत बदल होतो का हे लक्षात घ्यावे. जर पाच मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यापेक्षा कमी होत असेल,चालण्या पूर्वीची पातळी होती त्यापेक्षा तीन टक्क्यापेक्षा ऑक्सिजन पातळी कमी होत असेल, चालताना दम,थाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे असे समजून दवाखान्यात दाखल करावे. Puls Oximeter घरामध्ये प्लस ऑक्सि मीटर असेल तर वारंवार ऑक्सिजन पातळी तपासून आजाराचे गांभीर्य ओळखून लवकर आपल्याला रुग्णालयात दाखल होता येईल.

Leave a Comment

x