प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
Pradhanmantri matru vandana yojana आज ग्रामीण स्त्रियाही कुटुंबाला मोठ्या प्रमाणात आधार देण्यासाठी काम करत आहेत.विविध स्वरूपाच्या रोजगारात गुंतले आहेत. असंघटित क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रियांना तर बाळंतपणानंतर पुरेसा आरामही मिळत नाही. दैनंदिन गुजरा कसं करायचा मजुरी बुडेल अशा अनेक विवनचं ला तिला समोर जावे लागत आणि मग ती पुरेसा आराम न करता पुन्हा कामावर जायला लागते जेव्हा की तिला त्या काळात सर्वात जास्त आरामाची गरज असते. तिच शरीर काम करण्यासाठी तयार झालेलं नसतं.याचा तीच्या स्वतःच्या प्रकृती बरोबर बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.आई कामावर गेल्याने बाळाला आईचे दूध मिळत नाही. बाळाचे पोषण होत नाही आणि यातून कुपोषणाची समस्या जन्म घेते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 1 जानेवारी 2017 पासून राबवण्यास सुरुवात केली आहे.
योजनेचा मुख्य उद्देश प्रसुतीच्या अगोदर व प्रसूती नंतर पहिल्या जिवंत बाळा करिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरी चा लाभ व्हावा हा आहे. आर्थिक मोबदला दिल्यामुळे गरोदर व स्तनदा माता यांच्या आरोग्य सेवांचा लाभ घेण्याकडे कल वाढला आहे. मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यास योजना परिणामकारक ठरली आहे.
गरोदर व स्तनदा माता यांना रोख पाच हजार रुपये तीन हप्त्यात दिला जातो पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून शंभर दिवसात. गरोदरपणाची तारीख नोंदणी केल्यानंतर एक हजार, दुसरा हप्ता किमान एकदा प्रसव पूर्ण तपासणी केल्यानंतर गर्भधारणा सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दोन हजार व तिसरा हप्ता प्रसूतीनंतर अपत्याचे जन्मा नोंदणी व बालकास बीसीजी, ओ पी वि,डीपीडी हिपटायटीस बी व लसीकरणाची पहिला खुराक दिल्यानंतर दोन हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातात.
केंद्र शासनाने शहरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना Pradhanmatri matru vandana yojana 1 जानेवारी 2017 पासून सुरू केली आहे भारतामध्ये दर तीन स्त्रियांमध्ये एक स्त्री कुपोषित आहे कुपोषणामुळे अशा मतांची बालके कमी वजनाची असतात बालकांचे कुपोषण हे मातेच्या गर्भाशयात सुरू होते याचा अनिष्ट परिणाम म्हणून जीवन चक्रावर होतो. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून आर्थिक व सामाजिक ताण तणाव कमी केल्या जातो.काही महिला गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत घरची कामे करीत असतात बाळजन्मानंतर त्या लगेच कामाला लागतात अशा वेळी त्यांच्या शरीराची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे शारीरिक क्षमता पूर्वपदावर येण्यासाठी अडचणी निर्माण होतात या योजनेमध्ये या योजनेमुळे गरोदर माता व स्तनदा माता यांना आर्थिक लाभ होऊन आरोग्य सुधारणा होण्यास मदत होत आहे.