कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबाच नाहीतर Post Covid Vaccination

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अर्धातास थांबाच नाहीतर..

Covid Vaccination कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लसीकरण केंदात किमान तीस मिनिटे तरी थांबावे असा आग्रह वैद्यकीय तज्ञ करतात. लसीमुळे काही दुष्परिणाम तर जाणवत नाही ना हे अर्धा तासात स्पष्ट होते आणि दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकतात. लसीची एलर्जी असलेल्यांमध्ये लसीकरणानंतर ऑनाफीलैक्सीस होण्याची शक्यता असते.पण त्यामुळे घाबरून जाऊन लस घेणे टाळू नका.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबाच नाहीतर Post Covid Vaccination

लसीकरणानंतर ची लक्षणे किंवा रिएक्शन

कोराना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम संभवणा याची शक्यता कमी आहे. मात्र तरीही काही जणांमध्ये लसीचे दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारण्यात आलेले नाही.

1)  लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, त्वचा आणि गालावर लाल चट्टे येणे, हातापायावर सूज येणे, गंभीर एलर्जी असलेल्यांना त्वचेवर मोठमोठे फोड येऊ शकतात.

2) डोकेदुखी वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे.

3) एलर्जी असलेल्यांना जोखीम आहे परंतु ही लक्षणे वेळीच लक्षात आली तर त्यावर तातडीने उपचार करता येतात यासाठी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

4) लक्षानामुळे श्वसनात अडचणी निर्माण होऊ शकतात .श्वसनास त्रास होणे, खोकला,सर्दी इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

5) मळमळणे,उलट्या होणे,बद्धकोष्ठता वाढणे आदी त्रास जाणवण्याची शक्यता असते.
वरील लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत लसीकरणानंतर उद्भवणारी लक्षणे लक्षात घेता सर्वांसाठी अर्धा तास महत्त्वाचा आहे.

Leave a Comment

x