पंतप्रधान स्वानिधी लोन योजना
पंतप्रधान स्वानिधी लोन योजनेची सुरुवात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 जून 2020 रोजी सुरू केली. या योजनेअंतर्गत सर्व गरजू उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेचा लाभ पथ विक्रेते,भाजीविक्रेते,फळविक्रेते, रस्त्याच्या कडेचे दुकानदार विक्रेते यांना होणार आहे.
पंतप्रधान स्वानिधी लोन योजना PM Svanidhi Yojana
पंतप्रधान स्वानिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुलभ हत्यांमध्ये त्याची परतफेड करून घेणे आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारांमुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. छोट्या-छोट्या व्यवसायाची बिकट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणारे फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांना अडचणीतून दूर करण्यासाठी या योजनेअंतर्गत लोकांना पुन्हा काम सुरू करण्यास मदत मिळणार आहे.काम पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून रुपये 10,000 दहा हजार रुपये कर्ज दिले जाईल. या लोकांना स्वावलंबी आणि सशक्त बनविणे म्हणजेच योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.
पंतप्रधान स्वा निधी या योजने अंतर्गत देशातील पथ विक्रेते दहा हजार रुपये पर्यंत भांडवली कर्ज घेऊ शकतात. जे लाभार्थी वर्षभर सुलभ हप्तामध्ये परतफेड करू शकतात. योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतल्यास आणि कर्जाची रक्कम वेळेपूर्वी परत केली तर केंद्र सरकारच सात टक्के वार्षिक व्याज त्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून जमा करेल. हे कर्ज घेण्यासाठी लाभार्थी व्यापाऱ्याला कोणत्या प्रकारचे हमी देण्याची गरज नाही.त्याशिवाय कर्जावर वर्षभर व्याज देखील कमी आकारले जाईल.
पीएम स्वानिधी योजना अर्ज साठी आवश्यक कागदपत्रे
1 अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा
2 अर्जदाराचे आधार कार्ड
3 मतदार ओळखपत्र
4 मोबाईल नंबर
5 पासपोर्ट आकाराचा फोटो
6 बँक खाते पासबुक
ह्या योजने अंतर्गत देशातील फक्त छोट्या पथ विक्रेत्यांना पात्र मानले जाईल.
अर्ज कसा करावा
सरकारकडून पंतप्रधान स्वा निधी योजना अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या देशातील कोणत्याही व्यापारी लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करावा लागेल अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी बँकेतून अर्ज ही मिळू शकतो.