प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना PM Mudra Loan Yojana

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक लोन योजना आहे. ज्यामध्ये लघु उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग उभारून उद्योजक बनू शकता. पंतप्रधान मुद्रा योजना ही सूक्ष्म व लघुउद्योग यांना परवडणारी पतपुरवठा करण्यासाठी भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना PM Mudra Loan Yojana

या योजनेअंतर्गत कर्ज उत्पादन व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न असलेल्या सूक्ष्म किंवा लघुउद्योगांना उपलब्ध आहे. संबंधित कृषी कार्यात गुंतलेले उद्योजक मुद्रा कर्जासाठी देखील अर्ज करू शकतात. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची किमान रक्कम नाही परंतु कमाल कर्जाचे रक्कम 10 लाख रुपये आहे.

मुद्रा कर्ज ही एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. या योजनेअंतर्गत बिगर शेती आणि बिगर कार्पोरेट सुक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

कर्जाच्या रकमेवर अवलंबून तीन प्रकारचे मुद्रा कर्ज आहेत

1)शिशु -योजनेअंतर्गत 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकते.
2)किशोर-योजनेअंतर्गत कर्ज पन्नास हजार ते पाच लाख रुपये पर्यंत मंजूर होऊ शकते
3) तरुण- योजनेअंतर्गत पाच लाख रुपये ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.

जर तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर कर्ज घेतलेल्या पासून तीन ते पाच वर्ष हा त्या कर्जाची परतफेड कालावधी असेल.प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी लघु उद्योग व्यवसाय मालक, फळ आणि भाजी विक्रेते,पशुधन दुग्ध उत्पादक,कुक्कुटपालन,मत्स्य पालन विविध शेतीविषयक उपक्रमांचे संबंधित दुकानदार कारागीर

मुद्रा योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे 

ओढख पुरावा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स. पत्त्याचा पुरावा वीज बिल किंवा गॅस बिल किंवा टेलिफोन बिल आणि व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र.

मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या वित्तीय संस्थेकडे जावे लागेल. भारतात जवळजवळ सर्व आर्थिक संस्थांमध्ये मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकता. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला कर्ज अर्ज भरावा लागेल आणि आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील द्यावा लागेल. बँक तुम्हाला मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पर्याय पुरवल्या जातील त्यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण हे पर्याय असतील तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही या तिने पैकी कोणताही एक पर्याय निवडून त्या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता.अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकता आणि आपल्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळवू शकता.

Leave a Comment

x